मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मधुरा वेलणकर झळकणार थ्रीलर वेबसिरीजमध्ये, फर्स्ट लुक आला समोर...

मधुरा वेलणकर झळकणार थ्रीलर वेबसिरीजमध्ये, फर्स्ट लुक आला समोर...

एक नवी वेबसिरीज 'क्राईम नेक्स्ट डोअर' (Crime Next Door) आपल्या भेटीला येणार आहे. ही थरारक कथा (Thriller) असणार आहे.

एक नवी वेबसिरीज 'क्राईम नेक्स्ट डोअर' (Crime Next Door) आपल्या भेटीला येणार आहे. ही थरारक कथा (Thriller) असणार आहे.

एक नवी वेबसिरीज 'क्राईम नेक्स्ट डोअर' (Crime Next Door) आपल्या भेटीला येणार आहे. ही थरारक कथा (Thriller) असणार आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 6 मे : सध्या वेबसिरीजची (websiries) मोठी चलती आहे. एकापाठोपाठ एक अनेक वेबसिरीज येत आहेत. गेल्या वर्षभरात तर कोरोना परिस्थितीमुळे चित्रपटगृहे आणि इतर करमणुकीची साधने उपलब्ध नसल्याने, लोकांनी जास्तीत जास्त वेबसिरीजला पसंती दर्शवली होती. त्यामुळे अनेक वेबसिरीजनां भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच एक नवी वेबसिरीज 'क्राईम नेक्स्ट डोअर'(Crime Next Door) आपल्या भेटीला येणार आहे. ही थरारक कथा(Thriller) असणार आहे. आणि महत्वाच म्हणजे यात मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) मधुरा वेलणकर-साटम (Madhura Velankar-Satam) सुद्धा असणार आहे. नुकताच मधुराचा या वेबसिरीज मधील फर्स्ट लुक (First Look)  समोर आला आहे.
थ्रीलर वेबसिरीज नेहमीचं प्रेक्षकांना आकर्षित करून घेत असतात. ‘नीला फिल्म प्रोडक्शन’ आपल्यासाठी अशीच एक थ्रीलर स्टोरी घेऊन येतं आहे. त्याचं नाव आहे 'क्राईम नेक्ट डोअर'.  काही दिवसांपूर्वी या वेबसिरीजचा पहिला पोस्टर रिलीज झाला होता. त्यानंतर आत्ता या वेबसिरीज मधील अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटमचा फर्स्ट लुक समोर आहे. मधुरा आपल्या भुमिकेसाठी खुपचं उत्सुक आहे. लवकरच थ्रीलर वेबसिरीज घेऊन आपल्या भेटीला येत असल्याचं तिनं म्हटलं आहे. (हे वाचा:‘औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना भररस्त्यात चोपला पाहिजे’, रितेश देशमुख संतापला  ) ही वेबसिरीज क्रिमिनल बेसिसवर आधारित आहे. हे आपल्याला नावावरूनचं लक्षात येतं. यामध्ये एक पोलीस अधिकारी आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण मर्डर केस हाताळताना दाखविण्यात आलं आहे. येत्या 15 मे ला ही वेबसिरीज डीज्ने हॉटस्टार वर रिलीज होणार आहे. ही वेबसिरीज 7 मे ला रिलीज होणार होती. मात्र काही कारणांनी ती पुढे ढकलण्यात आली आहे. (हे वाचा: मी आणि अंकुश होतो जुळे भाऊ', पाहा भरत जाधवच्या पहिल्या चित्रपटाचा भन्नाट किस्सा ) मधुरा वेलणकर-साटमने मराठी चित्रपटांत आपली खास ओळख निर्माण केली आहे. तिने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. ती प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रदीप वेलणकर यांची कन्या आहे. आणि प्रसिद्ध अभिनेता शिवाजी साटम यांची सून आहे. नुकताच मधुरा वेलणकरचा कोविड योद्धा म्हणून राज्यपालांकडून सन्मान देखील करण्यात आला आहे.
First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Web series

पुढील बातम्या