Home /News /entertainment /

'आम्ही एकमेकांचे सांता' क्रांती रेडकरने 'या' व्यक्तीसाठी लिहिली खास पोस्ट

'आम्ही एकमेकांचे सांता' क्रांती रेडकरने 'या' व्यक्तीसाठी लिहिली खास पोस्ट

बऱ्याचवेळा असं म्हटलं जातं की, दोन अभिनेत्रीमध्ये कधीच घट्ट मैत्री नसते. परंतु मराठी मनोरंजन सृष्टीत चित्र काहीसं वेगळं आहे. मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची एकेमकांशी फारच घट्ट मैत्री आहे. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) आणि क्रांती रेडकर (Kranti Redkar) होय.

पुढे वाचा ...
  मुंबई, 4 मे- बऱ्याचवेळा असं म्हटलं जातं की, दोन अभिनेत्रीमध्ये कधीच घट्ट मैत्री नसते. परंतु मराठी मनोरंजन सृष्टीत चित्र काहीसं वेगळं आहे. मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची एकेमकांशी फारच घट्ट मैत्री आहे. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे अभिनेत्री उर्मिला कोठारे   (Urmila Kothare) आणि क्रांती रेडकर  (Kranti Redkar)  होय. या लोकप्रिय अभिनेत्री एकमेकींच्या फार चांगल्या सखी आहेत. आज उर्मिलाचा वाढदिवस  (Urmilas Birthday)   आहे. म्हणूनच क्रांतीने आपल्या मैत्रिणीसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्री क्रांती रेडकर आणि उर्मिला कोठारे यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून घट्ट मैत्री आहे. या दोघी मैत्रिणींनीचं फारच सुंदर बॉन्डिंग आहे. या दोघी सतत एकमेकींच्या आनंदात आणि अडचणीत सहभागी होत असतात.त्या दोघी एकमेकींना आपला सांता समजतात. सांता जसा सर्वांच्या आयुष्यात सुंदर सुंदर भेटवस्तू देऊन त्यांच्या आयुष्यात आनंद पसरवत असतो. त्याचप्रमाणे क्रांतीसुद्धा उर्मिलाला आपल्या आयुष्यातील सांता समजते. नुकतंच अभिनेत्री क्रांती रेडकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. क्रांतीने इन्स्टावर आपला आणि उर्मिलाचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्या दोघीनी सांताची टोपीसुद्धा घातली आहे . सोबतच हातात फुगे घेतले आहेत. फोटो पाहून असं वाटत आहे की ख्रिसमस सेलिब्रेशनचा हा फोटो असावा.
  क्रांतीने दोघींचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, ''वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @urmilakothare. अनेक वर्षांपासून आम्ही एकमेकांचे सांता आहोत. फक्त असे म्हणायचे आहे की तू अविश्वसनीय धातू आणि सामर्थ्य असलेली स्त्री आहेस. तू प्रतिष्ठित आणि भव्य आहेस. ज्याच्यावर मी नेहमी विश्वास ठेवू शकते. माझी शाईन गर्ल. तू हिरा आहेस''. असं म्हणत क्रांतीने उर्मिलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या