मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सावजी मटण खाऊन क्रांतीची अवस्था झाली बिकट, व्हिडिओ होतोय व्हायरल

सावजी मटण खाऊन क्रांतीची अवस्था झाली बिकट, व्हिडिओ होतोय व्हायरल

क्रांती आपले पती समीर वानखेडे यांच्यासोबत नागपूरमध्ये काही कामानिमित्त गेली आहे.

क्रांती आपले पती समीर वानखेडे यांच्यासोबत नागपूरमध्ये काही कामानिमित्त गेली आहे.

‘कोंबडी पळाली’ या गाण्याच्या तालावर सगळ्यांनाच थिरकायला लावणारी अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकरला ओळखले जाते. ती कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 मार्च- ‘कोंबडी पळाली’ या गाण्याच्या तालावर सगळ्यांनाच थिरकायला लावणारी अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकरला ओळखले जाते. ती कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. क्रांती रेडकर हिनं एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती नागपुरची खाद्यसंस्कृतीचा आनंद घेताना दिसत आहे. पण हे करताना तिची अवस्था खूपच वाईट झाल्याचं समोर आलं आहे.क्रांतीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

क्रांती आपले पती समीर वानखेडे यांच्यासोबत नागपूरमध्ये काही कामानिमित्त गेली आहे. तिनं शेअर केलेल्या व्हिडिओत ती,समीर वानखेडे आणि दोन मैत्रिणी दिसत आहेत. नागपुरमधील सावजी मटणासाठी प्रसिद्ध असलेल्या एका हॉटेलात ते सगळे गेलेले दिसत आहेत. तिला सावजी मटणावर ताव मारनं महागतचं पडलं आहे.

वाचा-'त्याच्या पायाशी कधी बसायला मिळेल असं...';सिद्धार्थची अशोक मामांसाठी भावुक पोस्ट

क्रांतीनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला तर क्रांती असे विचित्र डोळे का करतेय हा प्रश्न पडतो आहे. पण मग तिचा कॅमेरा जेव्हा तिच्या पुढ्यात असलेल्या जेवणाच्या ताटाकडे जातो आणि त्यात सावजी मटण दिसतं तेव्हा त्यांना क्रांतीच्या असं करण्यामागचं कारण लक्षात येते. मटण खाल्यावर तिला तिखट लागल्याने सरळ नीट बोलताही येत नव्हत. डोळे आणि चेहरा लालेलाल झाला होता. एकूण काय या मटणानं तिचा चांगला घाम काढलेला दिसत आहे.

कारण सावजी म्हटलं की, जाळ आणि धूर संगंटच आलाचं. क्रांतीला अर्थातच ते तिखट जरा जास्तच झालेलं दिसत आहे. सावजी मटणाच्या तिखट चवीबद्दल ती इतकं मजेशीरपणे वर्णन करुन सांगतेय की, नेटकऱ्यांना देखील हासू आवरणं अवघडं झालं आहे.अभिनेत्री क्रांती रेडकर मध्यंतरी चित्रपटसृष्टीपासुन दूर होती मात्र ती आता पुन्हा सक्रिय झाली आहे. अभिनेत्रीला दिग्दर्शिका म्हणून आपण बघितले आहे. आता ती निर्माती म्हणून लवकरच आपल्यासमोर येणार आहे.

क्रांती रेडकरचा जन्म 17 ऑगस्ट 1982 रोजी मुंबई येथे झाला.तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. जेव्हा ती 3 वर्षांची होती तेव्हा तिने तिच्या शाळेतील एका नाटकात मदर तेरेसा यांची भूमिका केली होती.कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिने नाटकात काम करायला सुरुवात केली.क्रांती रेडकर यांचे शालेय शिक्षण कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल, मुंबई इथून पूर्ण झाले. क्रांती रेडकर यांचे कॉलेजचे शिक्षण रामनारायण रुईया कॉलेज, मुंबई इथून पूर्ण झाले.

क्रांती रेडकरचा पहिला चित्रपट सून असावी अशी (2000) हा आहे.2003 मध्ये, ती अजय देवगणसोबत प्रकाश झा यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट गंगाजलमध्ये दिसली.2006 च्या मराठी चित्रपट “जत्रा” मधील “कोंबडी पळाली” या मराठी गाण्यासाठी देखील ती ओळखली जाते. यानंतर ती शहाणपण देगा देवा, नो एंट्री पुढे झोका आहे, पिपाणी आणि करार या चित्रपटांमध्ये ती दिसली. 2014 मध्ये काकण या मराठी चित्रपटातून क्रांतीने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment