Home /News /entertainment /

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या कारचा भीषण अपघात, ट्रकची गाडीला जोरदार धडक

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या कारचा भीषण अपघात, ट्रकची गाडीला जोरदार धडक

Car accident: अभिनेत्री किशोरी शहाणे-वीज यांनी (Actress Kishori Shahane -Vij Car accident) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. नुकताच त्यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून त्यांचे फॅन्स काहीसे चिंतेत आहेत.

पुढे वाचा ...
मुंबई, 05 फेब्रुवारी: अभिनेत्री किशोरी शहाणे-वीज यांनी (Actress Kishori Shahane -Vij Car accident) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. नुकताच त्यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून त्यांचे फॅन्स काहीसे चिंतेत आहेत. या फोटोत कारला अपघात झाल्याचं दिसत आहे. याबाबतची संपूर्ण माहिती अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही. मात्र किशोरी आणि त्यांचे कुटुंबीय हे सुखरूप असून, कोणालाही दुखापत झाली नसल्याचं किशोरी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. किशोरी शहाणे -वीज सोशल मीडियावर (Kishori Shahane on Instagram) चांगल्याच सक्रीय असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत. नृत्याचे, सहकलाकारांसोबतचे, भटकंतीचे तसेच पती दीपक वीज यांच्यासोबतच्या खास क्षणांचे व्हिडीओ, फोटोज त्या नेहमीच शेअर करत असतात. त्यांची प्रत्येक पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरते. नुकतीच त्यांनी इन्स्टाग्रामवर केलेली एक पोस्ट मात्र चाहत्यांचा तसेच तमाम मराठी रसिकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी ठरली आहे. हे वाचा-Breaking News: लता मंगेशकर यांच्या प्रकृती संदर्भात मोठी अपडेट त्यांनी केलेल्या या पोस्टमधील छायाचित्रात त्यांच्या कारला अपघात (Car Accident) झाल्याचं दिसत आहे. पवना लेक परिसरात गिरावण येथून येत असताना दीपक वीज यांच्या गाडीला हा अपघात झाल्याचं समजतंय. या फोटोखाली कॅप्शनमध्ये किशोरी लिहितात की, 'आमच्या कारला अपघात झाला आहे. कारचं मोठं नुकसान झालं आहे. देवाच्या कृपेनं सुदैवानं आम्हाला कोणालाही इजा झालेली नाही. जा को राखे साईया मार सके ना कोई.'
किशोरी शहाणे-वीज या मराठी, हिंदी सिनेसृष्टी, नाट्यसृष्टी आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रतिथयश अभिनेत्री आहेत. अत्यंत सुंदर व्यक्तिमत्त्वाची ही अभिनेत्री अभिनयासह नृत्यकलेतही निपुण आहे. किशोरी यांनी आत्तापर्यंत 70 पेक्षा अधिक मराठी, हिंदी चित्रपटांमधून तसेच टीव्ही सीरियल्समधून भूमिका केल्या आहेत. बिग बॉस मराठी (Big Boss Marathi) या रिअॅलटी शोच्या एका सिझनमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या. त्यांची प्रमुख भूमिका असलेले अनेक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. किशोरी शहाणे यांचा विवाह चित्रपट निर्माते दीपक वीज यांच्याशी झालेला असून, या दांपत्याला एक मुलगादेखील आहे. दीपक वीज यांनी 'ऐका दाजीबा' या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. किशोरी शहाणे यांनी परदेशातही शास्त्रीय नृत्याचे शो केले आहेत. दामिनी, जुनून, अभिमान, गुम है किसी के प्यार में आदी टीव्ही सीरियल्समध्ये भूमिका केल्या आहेत. किशोरी शहाणे यांच्या या पोस्टवर कमेंटसचा अक्षरशः पाऊस पडला आहे. किशोर शहाणे आणि त्यांचे कुटुंबीय सुखरुप असल्याने चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला तरी या पोस्टमुळे चाहत्यांनी मात्र चिंता व्यक्त केली आहे.
First published:

Tags: Car, Entertainment, Road accident, Tv actress, Tv serial

पुढील बातम्या