• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • आईच्या पावलावर पाऊल टाकत 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लेकीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण

आईच्या पावलावर पाऊल टाकत 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लेकीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण

मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकरांच्या मुलांनी आई वडिलांच्या पाऊलवार पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. आता यामध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. विशेष म्हणजे ही नवखी अभिनेत्री तिच्या आईसारखीच सुंदर दिसते आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकरांच्या मुलांनी आई वडिलांच्या पाऊलवार पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. 'फुल थ्री धमाल' चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री किशोरी गोडबोले ( kishori godbole)यांची मुलगी सई गोडबोले (sai godbole) आता अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवायला सज्ज झाली आहे. सईने नुकतीच एका ब्रॅण्डच्या जाहिरातीत झळकली आहे. किशोरी यांनी सईचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअरत करत याबद्दल माहिती दिली आहे. आपल्या मुलीच्या यशाने त्यांना प्रचंड आनंद झाला असून किशोरी यांनी हा आनंद चाहत्यांसोबतही शेअर केला आहे. किशोरी गोडमला माझ्या मुलीचे हे यश तुमच्यासोबत शेअर करायला खूप आनंद होत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. इतर कलाकारांनी सईदेखील आपल्या आईप्रमाणेच कलाविश्व गाजवणार अशा शुभेच्छा देत तिचं कौतुक केलं आहे. यासोबतच चाहत्यांनी देखील सईच्या सुंदरतेचे कौतुक करत सईला शुभेच्छा दिल्या आहेत. सई आईसारखीच सुंदर दिसतेय ..अशा काहीशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
  दिवाळीनिमित्त नुकतीच शॉपर्स टॉपची नवी जाहिरात प्रदर्शित करण्यात आली. या जाहिरातीत सई देखील झळकली आहे. ही एक व्यावसायिक जाहिरात असल्याने हे सईसाठी यश मानलं जात आहे. सईचे वडील एक व्यावसायिक आहेत. दादर येथे त्यांचं एक दुकान असून सईदेखील वडिलांना दुकानात मदत करताना दिसते. आता सई आईच्या पावलावर पाऊल टाकत कलासृष्टीत दाखल झाली आहे. वाचा : ही मराठमोळी अभिनेत्री करणार लग्न, समुद्र किनारी केले PreWedding Shoot किशोरी सध्या मराठी चित्रपटसृष्टीपासून दूर असल्या तरीही त्या हिंदी मालिकांमध्ये काम करताना दिसतात. हिंदीमधील 'मेरे साई' या मालिकेत किशोरी बायजाबाई यांची भूमिका उत्तमरीत्या साकारत आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक मराठी व हिंदी मालिका तसेच चित्रपटात अभिनय केला आहे. वाचा :Aai Kuthe Kay Karte : आवाज खाली...म्हणत अरुंधतीने अनिरुद्धला दिली चांगलीच समज 'मिसेस तेंडुलकर', 'माधुरी मिडलक्लास', 'अधुरी एक कहाणी', 'हद कर दि', 'एक दो तीन', 'खिडकी' या मालिकेमध्ये किशोरी यांनी काम करत अभिनयचा ठसा उमठवला आहे.  मुलगी सईसोबतचे फोटो त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात.
  Published by:News18 Trending Desk
  First published: