Home /News /entertainment /

केतकी चितळेला जामीन मंजूर, मात्र पुढचे पाच दिवस रहावं लागणार तुरूंगात

केतकी चितळेला जामीन मंजूर, मात्र पुढचे पाच दिवस रहावं लागणार तुरूंगात

केतकी चितळेला अॅट्रोसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आज ठाणे न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

    मुंबई, 16 जून- अभिनेत्री केतकी चितळेला ( Ketaki Chitale  )  ठाणे न्यायलयाने जामीन मंजूर केला आहे. केतकी चितळेला अॅट्रोसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आज ठाणे न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात २०२०‌ साली अॅट्रोसेटी कायद्याअंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणीच तिला ( ketki chitale granted bail ) जामीन मंजूर झाला आहे. नवी मुंबई पोलिसांनी केतकी चितळेला अटक केल्यानंतर तिला ठाणे न्यायालयाने न्यालयीन कोठडी सुनावली होती. ठाणे न्यायालयात याप्रकरणी आज सुनावणी पार पडली. यावेळी युक्तिवाद होऊन तिला 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. केतकी चितळेला ठाणे कोर्टाने दिलासा दिला असला तरीही ती तुरूंगातच राहणार आहे, कारण ती आणखी एका प्रकरणात आरोपी आहे.  ज्या प्रकरणात 21 जून रोजी जामीनावर सुनावणी होणार आहे. मागच्या काही दिवासांपासून सोशल मीडियावर केतकी चितळे ( Ketaki Chitale Case ) हे नाव चांगलच चर्चेत आलं आहे. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणं तिला चांगल महागात पडलं होतं. केतकीच्या त्या पोस्टनंतर राज्यभर तिच्याविरोधात आंदोलनं झाली होती. तिच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे.  आता केतकी चितळेनं आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत त्याविरोधात पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi actress

    पुढील बातम्या