Home /News /entertainment /

'चितळेंची चाले फक्त बाकरवडी, केतकी तर....' राष्ट्रवादीच्या या नेत्याने साधला निशाणा

'चितळेंची चाले फक्त बाकरवडी, केतकी तर....' राष्ट्रवादीच्या या नेत्याने साधला निशाणा

अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही आपल्या सोशल मीडियातील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा केतकी चितळे तिच्या एका वादग्रस्त पोस्टमुळे (Controversial Facebook Post of Actress Ketaki Chitale) चर्चेत आली आहे.

    मुंबई, 14 मे- अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही आपल्या सोशल मीडियातील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियातील पोस्टमुळे केतकी यापूर्वी अनेकदा ट्रोलही झाली आहे. आता पुन्हा एकदा केतकी चितळे तिच्या एका वादग्रस्त पोस्टमुळे (Controversial Facebook Post of Actress Ketaki Chitale) चर्चेत आली आहे. केतकी चितळेने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा जरी दाखल करण्यात आला असला तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. केतकीला अटक करण्याची मागणी होत आहे. तसेच केतकीवर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी युवक काॅग्रेस कार्याध्यक्ष सूरज चव्हाण (ncp leader suraj chavhan) यांनीही दोन कवितेच्या ओळी ट्विट करत केतकीवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'नको करू एवढे पाप I शेवटी पवार साहेबचं तुझा बापII चितळेंची चाले फक्त  बाकरवडी I केतकी तर चार आण्याची पुडी I' अशी टीका केली आहे. वाचा-सोहेल खानची पत्नी सीमा आणि रोहित शर्मामध्ये आहे खास नातं, तुम्हाला माहितेय का? अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केतकीने 'तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती. शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त फेसबुक पोस्टनंतर कळवा पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलीस स्टेशनमध्ये 153 ओ आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने आता केतकी चितळे अडचणीत आली आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment, NCP

    पुढील बातम्या