Home /News /entertainment /

'माझी अटक बेकायदेशीर..' केतकी चितळे पुन्हा हायकोर्टात

'माझी अटक बेकायदेशीर..' केतकी चितळे पुन्हा हायकोर्टात

मागच्या काही दिवासांपासून सोशल मीडियावर केतकी चितळे ( Ketaki Chitale Case ) हे नाव चांगलच चर्चेत आलं आहे. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणं तिला चांगल महागात पडलं होतं.

    मुंबई, 16 जून- मागच्या काही दिवासांपासून सोशल मीडियावर केतकी चितळे ( Ketaki Chitale Case ) हे नाव चांगलच चर्चेत आलं आहे. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणं तिला चांगल महागात पडलं होतं. केतकीच्या त्या पोस्टनंतर राज्यभर तिच्याविरोधात आंदोलनं झाली होती. तिच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. केतकी चितळेनं आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत त्याविरोधात पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केतकी चितळेनं यापूर्वी देखील हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. आता एएनआयनं केलेल्या ट्विटमध्ये तिनं पुन्हा नव्यानं हायकोर्टामध्ये सुटकेसाठी अर्ज केला आहे. त्यामध्ये पोलिसांनी केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. वाचा-निर्मात्याने अखेर सांगूनच टाकलं कधी होणार 'तारक मेहता'मध्ये दयाबेनची एंट्री केतकीनं जामीन मिळावा यासाठी कोर्टाकडे अर्ज केला होता. त्यानंतर आता तिनं पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टाकडे मला केलेली अटक ही बेकायदेशील असून आपल्याला जामीन मिळावा अशी विनंती केली आहे. याशिवाय व्यक्तिस्वातंत्र्याचा भंग केल्याबद्दल नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती केतकीनं याचिकेद्वारे केली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत पोस्ट करत खळबळ माजविली होती. त्यांनतर सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ माजला होता.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Sharad Pawar (Politician)

    पुढील बातम्या