मुंबई,24 नोव्हेंबर: ड्रग पेडलरला पकडायला एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. यात NCBचे अधिकारी जखमी झाले होते. जखमी अधिकाऱ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मिशनवर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेही गेले होते. या घटनेनंतर समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि त्यांच्या टीमच्या पाठिशी वेगवेगळ्या स्तरातील लोक उभे राहिले. समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर –वानखेडे (Kranti Redkar) हिलाही अनेकांनी मेसेज आणि कॉल करत समीर वानखेडे यांच्या विचारपूस केली. याबद्दल अभिनेत्रीने सर्वांचे आभार मानले आहेत. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर क्रांतीने एक पोस्ट शेअर केली आहे.
क्रांती रेडकरने लिहीलं आहे, ‘तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभार. समीर वानखेडे यांची तब्येत ठीक आहे. आमच्या घरातील सर्वच कुटुंबीय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. एनसीबीच्या संपूर्ण टीमला कडक सॅल्यूट. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.’
काय घडला होता प्रकार?
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम रविवारी उशिरा गोरेगाव परिसरात ड्रग पेडलरला पकडायला गेली होती तेव्हा तिथे आधीपासूनच जवळजवळ 50 लोक उपस्थित होते. NCBची 5 जणांची टीम सध्या वेशात ड्रग पेडलर मेंडिसला अटक करण्यासाठी गेली होती. त्या वेळेस अनोळखी व्यक्ती म्हणून एनसीबीच्या टीमला घेराव घालण्यात आला. NCB चे अधिकारी आहोत हे सांगण्या आधीच काही जणांनी NCB च्या टीमशी झटापट केली. दरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क झाला होता आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी आले होते. या प्रकरणी कॅरी मेंडेसा या अंमली पदार्थ तस्करा सह 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांचं लग्न 29 मार्च 2017 रोजी झालं होतं. त्यांना 2 मुलंही आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.