मराठी चित्रपटसृष्टीला धक्का; 'लागिरं झालं जी' मालिकेतील अभिनेत्रीचं निधन

मराठी चित्रपटसृष्टीला धक्का; 'लागिरं झालं जी' मालिकेतील अभिनेत्रीचं निधन

लागिरं झालं जी (Lagira Jhala Ji) मालिकेमध्ये जीजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कमल ठोके (Kamal Thoke) यांचं निधन झालं. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर: ‘लागिरं झालं जी’ (Lagira Jhala Ji) या मालिकेमध्ये ‘जीजी’ची भूमिका गाजवणाऱ्या अभिनेत्री कमल ठोके यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे मालिकेतल्या कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. कमल ठोके यांचं शनिवारी निधन झालं. आज (15 नोव्हेंबर) त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. कमल ठोके यांना कॅन्सर झाला होता. कमल ठोके यांनी या आधी काही मराठी चित्रपटातदेखील भूमिका साकारल्या आहेत. ना. मुख्यमंत्री गावडे, सख्खा भाऊ पक्का वैरी, बाबा लगीन, वरड, माहेरचा आहेर या चित्रपटामध्ये त्यांनी अतिशय उत्तम भूमिका साकारल्या. कमल ठोके काही दिवसांपासून बंगळुरुला आपल्या मुलाकडे रहायला गेल्या होत्या. त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते.

शिक्षिका ते अभिनेत्री

कमल ठोके यांचं लग्नाआधी फक्त दहावीपर्यंत शिक्षण झालं होतं. पण शिक्षणाची आवड असल्याने त्या लग्नानंतरही शिकत राहिल्या. त्यांनी एम. ए पूर्ण केलं आणि शिक्षिका म्हणून नोकरीला सुरुवात केली. त्या उत्तम शिक्षिका होत्या. अभिनेते श्रीराम लागू यांच्याहस्ते त्यांना सर्वोकृष्ट शिक्षिकेचाही पुरस्कार मिळाला होता. 33 वर्ष न्यानदानाचं कार्य केल्यानंतर त्या निवृत्त झाल्या. मुख्यध्यापिका म्हणून त्यांनी कारकीर्द सांभाळली. कमल ठोके यांच्यासोबत मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री शिवानी बोरकर आणि नितीश चव्हाण यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांना कमलताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.

ठोकेताईंना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. घर आणि नोकरी सांभाळत त्या छोट्या – मोठ्या भूमिका साकारत होत्या. लोककलेमध्ये त्यांना विशेष आवड होती. शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असतानाही त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना संगीताबद्दल आणि अभिनयाबद्दल मार्गदर्शन केलं. त्यांच्या निधनामुळे त्यांचे सहकलाकार आणि शिष्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 15, 2020, 9:42 AM IST
Tags:

ताज्या बातम्या