मुंबई 20 मार्च: कोरोना विषाणूचं संक्रमण पुन्हा एकदा वाढू लागलं आहे. त्यामुळं या वाढत्या संक्रमणाला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं पुन्हा एकदा काही निर्बंध लादले आहेत. त्यामधील एक निर्बंध म्हणजे मॉलमध्ये जाताना कोरोना निगेटिव्हचं प्रमाणपत्र बाळगणं आता बंधनकारक असणार आहे. सरकारच्या या निर्णयावर मराठी अभिनेत्री जुई गडकरी हिनं संताप व्यक्त केला आहे. मॉलमध्ये जाताना कोरोना सर्टिफिकेट लागते मग बेस्टच्या तुडुंब भरलेल्या बसमधून जायला कोणता रिपोर्ट द्यायचा? रुग्णामागे मिळणारे दीड लाख रुपये बंद झाल्यानं कोरोनाची दुसरी लाट आली आहे का? असा रोखठोक सवाल तिनं फेसबुकद्वारे महाराष्ट्र सरकारला केला आहे.
पाहूया नेमकं काय म्हणाली जुई?
“कोव्हिड19 निगेटिव्ह रिपोर्ट मॉलमध्ये प्रवेशासाठी बंधनकारक. आणि ठाण्याच्या जांभळीच्या मार्केटमध्ये जायला कोणता रिपोर्ट? बेस्टच्या तुडुंब भरुन जाणाऱ्या बसमधून जायला कोणता रिपोर्ट? परवाच कर्जतजवळच्या अंकल्स किचनबाहेर दोनशेपेक्षा जास्त गाड्या लागल्या होत्या आणि जोरदार लग्न सुरु होता. मग 50 माणसांचा नियम कुठे गेला?” आजही काही मोठ्या युनिव्हर्सिटीज (पारुल युनिव्हर्सिटी) कॉन्व्होकेशन करत आहेत, 4500 जणांसह, रुल्स करताय तर सगळीगडे सारखे करा. मॉलमध्ये लोक निदान एकमेकांना चिकटून तरी बसत नाहीत. तरी टेस्ट कम्पलसरी आणि बेस्ट बसेसमध्ये जवळजवळ एकमेकांच्या मांडीत बसतात.
“परवा माझ्या एका मैत्रिणीचा डिलीव्हरी आधी कोव्हिड रिपोर्ट केला आणि तो दुर्दैवाने पॉझिटिव्ह आला. तिचा सी सेक्शन करावं लागलं वेगळ्याच हॉस्पिटलला. कारण तिला ज्या हॉस्पिटलमध्ये डिलीव्हरीसाठी नेलं होतं, त्यांनी तिला दाखल करण्यास नकार दिला. विनोदाची गोष्ट म्हणजे कोरोनाग्रस्त रुग्ण असूनही तिला बाळाला स्तनपान करु दिलं. बाळ तिच्यापासून अवघ्या पाच फुटांवर ठेवलं होतं. ती असिम्पटमॅटिक होती. त्यांना भरमसाठ बिल भरावं लागलं.” अशा तक्रारी जुईनं आपल्या फेसबुक पोस्टमधून मांडल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Covid-19, Marathi actress, Social media viral