मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ऋता दुर्गुळेच्या आयुष्यात खास व्यक्तीची एंट्री; सोशल मीडियावरून दिली प्रेमाची कबुली

ऋता दुर्गुळेच्या आयुष्यात खास व्यक्तीची एंट्री; सोशल मीडियावरून दिली प्रेमाची कबुली

'मन उडु उडु झालं' या मालिकेतील दिपू म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे (hruta durgule) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.ऋताने इन्स्टावर एक खास व्यक्तीसोबत एख फोटो शेअर केला आहे.यामुळी ती चर्चेत आली आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 18 नोव्हेंबर- 'मन उडु उडु झालं' या मालिकेतील दिपू म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे (hruta durgule) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तिचे विविध फोटो तसेच व्हिडीओ याच्यामाध्यमातून ती चाहत्यांशी नेहमी कनेक्ट असते. नुकतीच तिनं एक खास गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

ऋताने इन्स्टावर एक खास व्यक्तीसोबत एख फोटो शेअर केला आहे.यामुळी ती चर्चेत आली आहे. ऋतानं प्रेमात पडल्याची कबुली या पोस्टमध्ये दिली आहे. चित्रपट दिग्दर्शक प्रतिक शाहसोबतचा (prateek shah) एक खास फोटो शेअर करत तिनं चाहत्यांसोबत ही खास गोष्ट शेअर केली आहे. 'एक दिवाना था' या शोचं देखील दिग्दर्शन प्रतिकने केले आहे. यासोबतच प्रतिकने देखील सोशल मीडियावर दोघांचा फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली आहे.   ऋताच्या या पोस्टवर अनेक कलाकार व चाहत्यांने कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे.

वाचा : 'तुझ्या माझ्या..' : अदिती- सिद्धार्थच्या आयुष्यात आलेली ही नवीन व्यक्ती कोण?

मास मीडिया या पदवी अभ्यासक्रमातील जाहिरात क्षेत्रात शिक्षण घेतलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिच्या 'दुर्वा' या मालिकेतून सर्वांसमोर आली. त्यानंतर ती 'फुलपाखरू' मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. सध्या ती मन उडु उडु झालं या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Hruta (@hruta12)

काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर 'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत ऋता आणि अजिंक्य राऊत मुख्य भूमिकेत साकारत असून अगदी पहिल्या भागापासून ही मालिका लोकप्रिय ठरत आहे. इतकंच नाही तर ऋता  आणि अजिंक्यची जोडी प्रेक्षकांना विशेष भावत आहे. या मालिकेत ऋताने दीपिका देशपांडेची भूमिका निभावतेय. दीपिका ही मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी असून ती आपल्या बाबांच्या तत्वांना धरून आयुष्यात पुढे जातेय. पण याच दरम्यान तिच्या आयुष्यात इंद्राची एंट्री होते.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Zee marathi serial