मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ऋता दुर्गुळेचा साखरपुड्याचा धमाका; VIDEO आला समोर

ऋता दुर्गुळेचा साखरपुड्याचा धमाका; VIDEO आला समोर

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रियकर प्रतीक शाह (Prateek Shah) यांचा साखरपुडा आज मोठ्या थाटात पार पडला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रियकर प्रतीक शाह (Prateek Shah) यांचा साखरपुडा आज मोठ्या थाटात पार पडला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रियकर प्रतीक शाह (Prateek Shah) यांचा साखरपुडा आज मोठ्या थाटात पार पडला आहे.

  • Published by:  News18 Trending Desk
मुंबई, 24 डिसेंबर- मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रियकर प्रतीक शाह (Prateek Shah) यांचा साखरपुडा आज मोठ्या थाटात पार पडला आहे. याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या दोघांच्या साखरपुड्याची (Hruta Durgule Engagement)चर्चा रंगली होती. फायनली यांचा साखरपुडा झाला आहे. या क्यूट कपलवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एका पोर्टलने देखील यांच्या साखरपुड्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ऋता दुर्गुळेने यावेळी  जांभळ्या रंगाच्या वनपिस घातला आहे. तर यालाच मॅच होणार सूट प्रतिकने घातला आहे. यांची जोडी खूपच छान दिसत आहे. ऋता गेल्या काही दिवसांपासून प्रतीकसोबतचे फोटो पोस्ट करत आहे. आता या दोघांनी साखरपुडा करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मागच्या दोन दिवसापासून ती मेंदी तसेच पार्लरमधील फोटो, व्हिडिओ शेअर करत आहेत. यावरून चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता. ऋता लग्न करणार की साखरपुडा. चाहत्यांना आज या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.
ऋता दुर्गुळेनं काही दिवसांपूर्वीच रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. दिग्दर्शक प्रतीक शाहला ती डेट करत आहे .प्रतीक आणि ऋता सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. प्रतीक हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. 'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यांसारख्या मालिकांचं दिग्दर्शन प्रतीकने केलं आहे. वाचा-ऋताच्या मेंदी आणि BRIDAL फेसपॅकवरून रंगली साखरपुड्याची चर्चा! मास मीडिया या पदवी अभ्यासक्रमातील जाहिरात क्षेत्रात शिक्षण घेतलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिच्या 'दुर्वा' या मालिकेतून सर्वांसमोर आली. या मालिकेनं जवळपास हजार भागांचा टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतर ती 'फुलपाखरू' मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. तिची क्रेज पाहता मराठी अभिनेत्रींमध्ये सोशल मीडियावर सर्वात जास्त लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. सध्या ती मन उडू उडू झालं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

पुढील बातम्या