मुंबई, 19 मार्च- फुलपाखरु','दुर्वा' आणि ' मन उडू उडू झालं' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. पहिल्या मालिकेपासून हृताने कलाविश्वात तिचा दबदबा निर्माण केला आहे. हृताने तिच्या सौंदर्याच्या जोरावर आज मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. ह्रतानं मालिका, नाटक आणि आता सिनेमा अशा तिन्ही माध्यमात काम केलं आहे. यंदा वर्ष तिच्यासाठी खासच म्हणावं लागेल. तिच्या अभिनय कारकिर्दीला 10 वर्षे पूर्ण झाले आहेत. ह्रतानं खास पद्धतीनं सेलिब्रेशन देखील केलं आहे.
ह्रता दुर्गुळेनं अभिनय कारकिर्दीला दहा वर्ष पूर्ण झाल्याची गोड बातमी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोबत तिनं सेलिब्रेशनचे काही सुंदर फोटो शेअर देखील केले आहेत. या फोटोत ती मस्त पिझ्झाचा बाईट घेताना दिसत आहे. तर एक फोटोत तिच्या कलरफूल असं डोनेट दिसत आहे. सोबत तिच्या हातात मेणबत्ती देखील दिसत आहे. या फोटोत ती आनंदी दिसत आहे. तिनं फोटो शेअर करत म्हटलं आहे की, बघता बघता दहा वर्षे पूर्ण झाली.तिच्या या यशस्वी प्रवासाबद्दल चाहत्यांनी देखील कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे.
वाचा-'आई कुठे काय करते' फेम गौरीचा मोठा अपघात; थोडक्यात बचावला अभिनेत्रीचा जीव
ह्रताचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिच्याबद्दल प्रत्येक लहान-मोठी गोष्ट जाणून घेण्याबद्दल चाहते उत्सुक असतात. ह्रताचे इन्स्टाग्रामवर 2.6 मिलियन फॉलोवर्स आहेत. ऐवढे जास्त फॉलोवर्स असणारी ह्रता ही पहिली मराठी अभिनेत्री आहे.
View this post on Instagram
ह्रतानं यंदा टायमपास 3 व अनन्या या सिनेमातून मराठी सिनेमा जगतात पाऊल ठेवलं. हे सिनेमे देखील यशस्वी झाले. ह्रताच्या अभिनयाचे देखील कौतुक झालं. आता तिच्या सर्किट या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. नेमकी तिची भूमिका कशी असणार यासाठी चाहते उत्सुक आहेत.
हृताने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केली होती. हृता ही मूळची कोकणातली मात्र ती लहानाची मोठी झाली ती मुंबईत झाली. रामणारायन रुईया कॉलेजमधून शिक्षण घेत असताना तिला अभिनय क्षेत्राची ओढ लागली. आज हृता छोट्या पडद्यावरील यशस्वी अभिनेत्रीपैकी एक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.