Home /News /entertainment /

वहिनीसाहेबांचा लेकासोबत रॉयल अंदाज, धनश्री काडगावरकरचा छोट्या कबीरसोबत पाहिला मिळाला क्यूट अंदाज!

वहिनीसाहेबांचा लेकासोबत रॉयल अंदाज, धनश्री काडगावरकरचा छोट्या कबीरसोबत पाहिला मिळाला क्यूट अंदाज!

अभिनेत्री धनश्री काडगावकर मुलगा कबीरचे ( dhanashri kadgaonkar son ) क्यूट व्हिडिओ असतील किंवा फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिनं मुलगा कबीर सोबतचा एक क्यूट असा तितकाच रॉयल असा व्हिडिओ शेअर केला आहे.

  मुंबई, 24 मे- अभिनेत्री धनश्री काडगावकर ( dhanashri kadgaonkar ) तुझ्यात जीव रंगला मालिकेतील वहिनीसाहेब या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. धनश्री काडगावकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे विविध व्हिडिओ तसेच फोटो ती शेअर करत असते. शिवाय मुलगा कबीरचे ( dhanashri kadgaonkar son ) क्यूट व्हिडिओ असतील किंवा फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिनं मुलगा कबीर सोबतचा एक क्यूट असा तितकाच रॉयल असा व्हिडिओ शेअर केला आहे. धनश्रीनं इन्स्टाला तिच्या मुलासोबत खास मराठमोळ्या अंदाजात एक व्हिडिओ शूट केला आहे. यामध्ये तिचा मुलग्याचा क्यूटनेस पाहून चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे. अनेकांनी किती..गोड..असं म्हणत तिच्या मुलाच्या क्यूटनेसचे कौतुक केलं आहे. या व्हिडिअमध्ये धनश्री आणि तिचा मुलगा कबीरने मॅचिंग रंगाचे कपडे घातले आहेत. धनश्रीने पिवळ्या रंगाची काठपदराची नऊवारी नेसली असून त्यावर मराठमोळ्या पद्धतीने साजशृंगार केला आहे. तर, कबीरला कुर्चा विथ जॅकेट आणि धोतर घातलं आहे. सध्या या माय-लेकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  प्रेग्नंसी दरम्यान धनश्री काडगावकरचं वजन 25 किलो वजन वाढलं असल्याचे तिनं नुकतचं एका मुलाखतीत सांगितलं होतं. यामुळे तिला कशाप्रकारे ट्रोलिंगचा ( dhanashri kadgaonkar troll ) सामाना करावा लागला याचा धक्कादायक अनुभव तिनं सांगितला होता.धनश्री सध्या तिच्या ( dhanashri kadgaonkar transformation ) ट्रान्सफॉर्मेशनमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी सध्या ती वर्कआऊट करताना दिसते. त्याचेच व्हिडिओ ती शेअर करत असते. तिनं वजन कमी केल्याचे दिसते. यासाठी तिनं घेतलेली मेहनत देखील दिसते. आता पुन्हा एकदा धनश्री पूर्वीसारखीच ग्लॅमरस दिसू लागली आहे.
  दररोज ती वर्कआऊट, योगा, डाएट करत तिने आपलेले वाढलेले वजनही कमी केल्याचे पाहायला मिळतंय. तिच्या फोटोशूटमुळे ती नेहमीच लक्षवेधून घेत असते
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या