'माझ्या काकांना मदत करा' आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबियांसाठी भार्गवी चिरमुलेची भावनिक पोस्ट

'माझ्या काकांना मदत करा' आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबियांसाठी भार्गवी चिरमुलेची भावनिक पोस्ट

अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने (Bhargavi Chirmule) 'चुलत काकांना व्यावसायात मदत करा' असं आवाहन तिच्या पोस्टमधून केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर: कोरोनामुळे (Corona) अनेकांच्या आयुष्यात नैराश्य आलं आहे. अनेकांना आर्थिक चणचण भासत आहे. हळूहळू आपण या परिस्थितीमधून बाहेर पडत असलो तरीही विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा रुळावर यायला वेळ लागणार आहे. अभिनेत्री भार्गवी चिरमुले (Bhargavi Chirmule) हिने अशी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. भार्गवीचे चुलत काका आणि आत्या  पुण्याला राहतात. त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची आहे. भार्गवी म्हणते, मी आणि माझे कुटुंबिय शक्य तेवढी मदत त्यांना करतोच पण माझ्या पुण्यातल्या मित्र-मैत्रिणींनीही त्यांच्याकडून गरजेचं सामान विकत घ्यावं. त्यांच्याकडून कॅलेंडर किंवा उदबत्या घेतल्याने त्यांना आर्थिक मदत होणार आहे.

भार्गवी चिरमुलेनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहीलं होतं, ‘माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू...... हे आहेत

श्री. चिरमुले आजोबा कोरोनाने अनेकांचे कंबरडे मोडले त्यात यांचे देखील पण अनेकांनी शिकावी अशी यांची वयाच्या ८१ तही असलेली जगण्याची जिद्द आणि लढाऊ वृत्ती....हे आजोबा आपल्या 65 वर्षीय मूक-बधिर बहिणीसोबत सदाशिव पेठेतील एका वाड्यात रहातात. उदरनिर्वाहासाठी दोघेही बँकांमधून शेव, फरसाण वगैरे पदार्थ विकतात आणि रोज संध्याकाळी सदाशिव पेठेत एका स्टूलावर सर्व पदार्थ मांडून विकण्याचा प्रयत्न करतात. पण कोरोना आला आणि सोबत यांच्या आयुष्यात घेऊन आला मोठ्ठे प्रश्नचिन्ह ??? बँका चालू होत्या, चालू आहेत आजोबांची बँकेत जाऊन पदार्थ विकण्याची तयारीही आहे. पण बँकेतले कर्मचारी आजोबांना आता येऊ देत नाहीत, अर्थात स्वतःच्या आणि आजोबांच्या काळजीपोटी.. पण आता करायचे काय ? चिरमुले आज्जी आजोबा या पदार्थांसोबत कधी उदबत्ती, कधी वाती ,कधी पंचांग विकायला आणतात. आता आजोबांनी कॅलेंडर विकायला ठेवली आहेत. आपल्या सर्वांना एक आवाहन आहे. कॅलेंडर तर आपण कोठून तरी घेणारच मग आपल्या नवीन वर्षाची सुरुवातच एका चांगल्या कामाने झाली तर ? आपण घ्या आणि आपल्या मित्रमंडळींना पण सांगा आपल्यासाठी असलेलं 'कॅलेंडर' कोणाच्यातरी जगण्याचा आधार बनू शकेल...’

भार्गवीने आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आयडियाची कल्पना, संदूक, धागेदोरे, अनवट अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. एका पेक्षा एक हा या शोमध्ये ती विजेती ठरली होती. आता भार्गवीच्या पोस्टमुळे तिच्या काका आणि आत्या यांना मदतीचा हात मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 13, 2020, 11:00 PM IST

ताज्या बातम्या