मुंबई, 25 ऑक्टोबर : मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने (bhagyashree mote )उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर तिचा स्वतंत्र असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी भाग्यश्री कायमच प्रयत्न करत असते. अलिकडेच भाग्यश्रीने तिच्या शरीरावर टॅटूमुळे चर्चेत आली होती. आता ती तिच्या एका नव्या फोटोमुळे (bhagyashree mote latest photo) सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
भाग्यश्री मोटेने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत म्हटले आहे की,फिलिंग एकदम कडक. तिच्या फोटोसोबत तिच्या या कॅप्शनची चांगलीच चर्चा रंगली. चाहत्यांकडून देखील या फोटोवर कमेंटचा वर्षाव होत आहे. तसेच या फोटोवर आतापर्यंत वीस हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.
View this post on Instagram
या फोटोत भाग्यश्री अतिशय सुंदर दिसत आहे. या तिची टोन बॉडी आणि फिटनेस सहज पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये तिने पांढरा रंगाचा क्राफ टॉप तर निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
वाचा : अमृता खानविलकरची बहीण आहे खूपच सुंदर ; करते हे काम, पाहा PHOTO
भाग्यश्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती देवो का देव, सिया के राम, जोधा अकबर या हिंदी मालिकेत दिसली आहे. तर देवयानी, देवा श्री गणेशा या मराठी मालिकांमध्ये देखील तिने काम केले आहे. या शिवाय काय रे रास्कला आणि माझ्या बायकोचा प्रियकर या चित्रपटाने तिने काम केले आहे. तसंच तेलुगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातही ती झळकली आहे.
वाचा :Zee Marathi च्या अभिनेत्रींसोबत 'मन उडु उडु झालं'वर गोविंदाने धरला ताल
यामुळे झाली होती ट्रोल
अलिकडेच भाग्यश्रीने तिच्या शरीरावर टॅटू गोंदवला होता ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.तिने टॅटू म्हणून महामृत्युंजय मंत्राची निवड केली होकी. परंतु, तिने शरीराच्या ज्या भागावर हा टॅटू काढला आहे तो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. भाग्यश्रीने तिच्या कंबरेच्या किंचितवरच्या भागामध्ये महामृत्युंजय मंत्राचा टॅटू काढला होता. हा टॅटू पाहिल्यावर अनेकांनी तिचं कौतुक केलं तर टॅटू काढण्यासाठी तिने निवडलेली जागा पाहून काही जणांनी तिला ट्रोल केलं होत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Tv serial