Home /News /entertainment /

भाग्यश्री मोटेनं सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली, रोमॅंटिक फोटो पोस्ट करत म्हणाली....

भाग्यश्री मोटेनं सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली, रोमॅंटिक फोटो पोस्ट करत म्हणाली....

नुकतीच भाग्यश्री मोटेने सोशल मीडिया पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली आहे. सोबत प्रियकरासोबत एक रोमॅंटिक फोटो ( bhagyashree mote boyfriend name ) देखील शेअर केला आहे.

  मुंबई, 21 मे- अभिनेत्री भाग्यश्री मोटे  (  bhagyashree mote ) सोशल मीडियानवर प्रचंड सक्रीय असते. नेहमीच तिच्या हटके फोटोशूटनं ती चाहत्यांचे लक्षवेधून घेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतीच भाग्यश्री मोटेने सोशल मीडिया पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली आहे. सोबत प्रियकरासोबत एक रोमॅंटिक फोटो   (  bhagyashree mote boyfriend name ) देखील शेअर केला आहे. भाग्यश्री मोटे हिने इन्स्टावर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, माझा... या कॅप्शनसोबत तिनं हार्ट इमोजीदेखील शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर तिच्या प्रियकरांने देखील कमेंट केली आहे. त्याने म्हटलं आहे की, तुझाच. भाग्यश्रीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. वाचा-संजनाला स्वयंपाक येत नाही पण रूपालीला येतो, विश्वास नसेल तर हा VIDEO पाहा सगळ्यांना प्रश्न पडला आहे की भाग्यश्री मोटेच्या प्रियकराचे नाव काय आणि तो करतो काय? तर भाग्यश्रीच्या प्रियकराचे नाव विजय पालांडे (   Vijay Palande ) आहे. विजय मेकअप डिझायनर आहे. विजयने देखील त्याच्या सोशल मीडियावर भाग्यश्रीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्याने देखील या फोटोंना रोमॅंटिक कॅप्शन देत म्हटलं आहे की, माझे प्रेम..
  भाग्यश्री मोटे ही पुण्याची असून ती सध्या मुंबईत रहाते. तिने अर्थशास्त्रात तिची पदवी घेतली आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच भाग्यश्रीला अभिनयाची आवड होती. तिने विश्वगर्जना हे व्यावसायिक नाटक केलं होतं.
  View this post on Instagram

  A post shared by Vijay Palande (@vjypalande)

  देवो के देव महादेव, सिया के राम या हिंदी मालिकांमुळे ती ओळखली जाते. सिया के राम या मालिकेत तिने शूर्पणखेची भूमिका केली होती. देवयानी ही तिची पहिली मराठी मालिका होती.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या