• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘माझ्यासारख पोरकं व्हायचं नसेल तर..’; वडिलांच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीने खाजगी रुग्णालयांची केली पोलखोल

‘माझ्यासारख पोरकं व्हायचं नसेल तर..’; वडिलांच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीने खाजगी रुग्णालयांची केली पोलखोल

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने खाजगी रुग्णालयातील भोंगळ कारभारावर जाहीरपणे ताशेरे ओढले आहेत. अश्विनीने काही दिवसांपूर्वींच तिच्या वडिलांना कोरोनामुळे गमावलं आहे.

 • Share this:
  मुंबई 2 जून : सध्याच्या कोरोनाच्या कठीण काळात अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे. यात अनेक सेलिब्रिटींचाही समावेश आहे. या काळात अनेक सेलिब्रिटींनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनीही जीव गमावला आहे. मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashvini Mahangade) काहीच दिवसांपूर्वी कोरोनाने आपल्या वडिलांना गमावलं. याची बातमी तिने स्वतःच सोशल मीडियावर दिली होती. पण आता तिने रुग्णलायाचा हलगर्जीपणाही समोर आणला आहे. अश्विनीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत खाजगी रुग्णालायांवर ताशेरे ओढले आहेत. तिने एक मोठी पोस्ट लिहीत आपलं दुःख व्यक्त केलं आहे. तसेच वाई आणि तेथील पंचक्रोशीतील लोकांना सतर्क केलं आहे. तसेच पैसे लुबाडणाऱ्या रुग्णालयांपासून सावध राहायला ही सांगितलं आहे. ती लिहीते, ‘वाई व पंचक्रोशील लोकांसाठी महत्वाचे...! पेशंट दगावला म्हणून तोडफोड करणे हा पेशा नाही आपला कारण वैद्यकीय सेवा देत असलेल्या प्रामाणिक लोकांचा आदर आहे. पण जे घडले आहे त्यावर व्यक्त व्हावे लागेल...’
  यानंतर अश्विनीने मोठी पोस्ट लिहीली आहे. ज्यात तिने तिच्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट आल्यापासूनचा सगळा घटनाक्रम सांगितला आहे. तसंच खाजगी रुग्णालयांची पोलखेल केली आहे. तिने म्हटलं आहे की, मी या रुग्णालायावर केस करणार नाही पण माझ्यासारखं पोरकं व्हायचं नसेल तर या रुग्णालयात न जाण्याचाही सल्ला दिला आहे. याशिवाय शेवटच्या पोस्टमध्ये तिने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रश्न विचारत म्हटलं आहे, ‘या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न आपले आरोग्य मंत्री मा.राजेश टोपे साहेब यांना विचारायचा आहे की ज्या खाजगी हॉस्पिटल ला तुम्ही कोरोना सेंटर म्हणून पत्र देता त्या हॉस्पिटलचा मृत्यू दर वाढतोय हे गृहीतच धरता का? मी अनुभवाशिवाय बोलत नाही पण जे माझ्या डोळ्यासमोर घडले ते महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी होत असणारचं.’
  पुढे ती म्हणते, ‘पेशंटवर कधी व कोणते उपचार सुरू आहेत याची माहिती घरच्यांनी जाणून घेणे हा गुन्हा आहे का.? असंच चालत राहिलं तर यांना कोणीच जाब विचारणारे राहणार नाहीत. बाकी कागदोपत्री यांना पोसणारे सरकारी यंत्रणेतील मंडळी आहेतच. यात शेवटी गोरगरीब व तोंड गप्प ठेवणाराचं भरडला जाणार. पुढची लिस्ट लवकरचं संबधित अधिकारी वर्गाकडे पाठवेन पण त्यांनीही जनतेचा विचार करून कारवाई केली तरचं बरं नाहीतर आहेचं येरे माझ्या मागल्या.’ अश्विनीच्या या आरोपांवर रुग्णालयांकडून अद्याप स्पष्टीकरण किंवा त्यांची बाजू पुढे आलेली नाही. ते आलं की या बातमीतच अपडेट करण्यात येईल. अश्विनी सध्या स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत काम करत आहे. याआधी तिने 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत 'राणुअक्का' ही भूमिका साकरली होती.
  Published by:News Digital
  First published: