मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /परदेशात अशी करतात ख्रिसमसची तयारी, अश्विनी भावेंनी Video शेअर करत दिली माहिती

परदेशात अशी करतात ख्रिसमसची तयारी, अश्विनी भावेंनी Video शेअर करत दिली माहिती

लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या अश्विनी भावे यांनी ख्रिसमससाठी खूप सुंदर प्रकारे घर सजवले आहे. सोशल मीडियावर यासंबंधी व्हिडिओ शेअर करत त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या अश्विनी भावे यांनी ख्रिसमससाठी खूप सुंदर प्रकारे घर सजवले आहे. सोशल मीडियावर यासंबंधी व्हिडिओ शेअर करत त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या अश्विनी भावे यांनी ख्रिसमससाठी खूप सुंदर प्रकारे घर सजवले आहे. सोशल मीडियावर यासंबंधी व्हिडिओ शेअर करत त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

मुंबई, 24 डिसेंबर- सगळीकडे सध्या ख्रिसमसची जोरदार तयारी सुरु आहे. बाजारपेठा देखील ख्रिसमसच्या साहित्यांनी सजल्या आहेत. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेली मराठमोळी अभिनेत्री अश्विनी भावे यांनी देखील ख्रिसमसची जोरदार तयारी केली आहे. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या अश्विनी भावे यांनी ख्रिसमससाठी खूप सुंदर प्रकारे घर सजवले आहे. सोशल मीडियावर यासंबंधी व्हिडिओ शेअर करत त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

यंदाही अश्विनी भावे यांनी ख्रिसमसची तयारी केली आहे. त्यांनी सुंदर ख्रिसमस ट्री सजवल्याचे त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. इन्स्टावर त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.अश्विनी भावेंसह घरातील सर्व मंडळी ख्रिसमसच्या तयारीला लागलेले दिसत आहेत.

अश्विनी भावे या जरी परदेशात स्थायिक झालेल्या असल्या तरी त्या सर्व सण उत्साहात साजरे करतात. यासबोतच त्यांना किचन गार्डनिंग करायला देखील आवडते. अनेकदा त्या परदेशातील त्यांच्या घरा शेजारील बागेतील काही फळझाडे तसेच भाज्या यांची माहिती देत असतात. सोशल मीडियावर यासंबंधी त्या व्हिडिओ शेअर करत असतात.

नव्वदच्या दशकात मराठीसह हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने अभिनेत्री अश्विनी भावे यांनी रसिकांची मनं जिंकली. आपल्या बहारदार अभिनयानं त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. त्या अमेरिकेत स्थायिक आहेत, हे चाहत्यांना माहीत आहेच. पण, अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी आपलं मराठीपण जपलं आहे.

वाचा-'आई कुठे काय करते'मधील जुना Video पाहून अरुंधतीला आलं भरून

अमेरिकेत राहूनही अश्विनी भावे यांचं मराठी आणि मराठी संस्कृतीवरील प्रेम कमी झालेलं नाही. दारापुढे अंगण, अंगणात तुळस आणि सोबतीला इतर झाडं अशी संस्कृती ग्रामीण भाग वगळता अपवादानेच पाहायला मिळते. शहरी भागातून लोप पावत जाणारी हीच संस्कृती अभिनेत्री अश्विनी भावे यांनी परदेशात जोपासली आहे.अंगणातील भाज्या ही पारंपरिक पद्धत त्यांनी अमेरिकेतही जपली आहे. त्यांचा हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वीरित्या सुरु आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment