Home /News /entertainment /

अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांनी केले भोंडल्याचे आयोजन ; मानसी नाईकसह या अभिनेत्रींनी लावली हजेरी

अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांनी केले भोंडल्याचे आयोजन ; मानसी नाईकसह या अभिनेत्रींनी लावली हजेरी

मराठमोळी अभिनेत्री अर्चना नेवरेकर व लीना नांदगावकर यांनी मिळून नुकतच भोंडल्याचे आयोजन केले होते. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी मिळून हा पारंपरिक भोंडला साजरा केला आहे.

  मुंबई, 13ऑक्टोबर: मराठमोळी अभिनेत्री अर्चना नेवरेकर (archana nevrekar) व लीना नांदगावकर यांनी मिळून नुकतच भोंडल्याचे (bhondla) आयोजन केले होते. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी मिळून हा पारंपरिक भोंडला साजरा केला आहे. याचे सुंदर फोटो व व्हिडिओ अर्चना नेवरेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कोरोना काळात भेटीगाठी थांबल्या होत्या मात्र आता हळू हळू परिस्थती पूर्वपदावर येत आहे. म्हणूनच नवरात्रीचेनिमित्ता साधत या सर्व सख्यांनी भोंडला कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमात मानसी नाईकचे (manasi naik )नवीन लग्न झाल्याबद्दल ओटी भरून विशेष कौतुक करण्यात आले. अर्चना नेवरेकर यांनी भोंडला कार्यक्रमाचे काही फोटो शेअर करत म्हटले आहे की, आज सगळ्या सख्या भेटलो .. प्रत्येकीच्या चेहऱ्यावरचा आनंद नजरेत कैद करावा असा होता.सगळ्या इतक्या सुंदर दिसत होत्या की माझीच नजर लागेल मुलींना😀❤️ त्यात आज चा देवीचा रंग लाल ..जणू तीच लाली सगळ्यांच्या गालावर आली असावी❤️.मानसी नाईक ❤️ हीच लग्न नुकतच झाले आहे.आणि मुद्दामून हा योग आम्हीं जुळाऊन आणला होता 😘❤️ लग्ना नंतर तिचा हा पहिला भोंडला आणि तिच कौतुक करताना खूप मज्जा आली 😘😘❤️.नवीन नवरीची लाली अजून तशीच आहे तिच्या गालावर. .सगळ्या मुलींनी आपल्या कामातून वेळ काढला आणि भोंडल्याची मज्जा घेतली खूप गप्पा मारल्या ..."नैवैद्य "च्या जेवणाची चव अजूनही जिभेवर आहे.
  या कार्यक्रमानिमित्ताने नुकतच लग्न झालेल्या अभिनेत्री मानसी नाईक खरेराचे गोड कौतुक करून ओटी भरण्यात आली. याचा एक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे. वाचा : Navratr च्या सातव्या दिवशी मराठमोळी 'ही' अभिनेत्री नटली चंद्रपूरच्या महाकाली देवीच्या रुपात मानसीने हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, काही नाती बनत नसतात.मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यातकाहि जण हक्काने राज्य करतात. त्यालाच तर “मैत्री” म्हणतात…🎀 या व्हिडिओमध्ये अभिनेत्री अर्चना नेवरेकर मानसीला भरवताना तिचे लाड करताना दिसत आहे.
  या कार्यक्रमाला अर्चना नेवरेकर,मेघा धाडे, लीना नांदगावकर, मानसी नाईक, सुप्रिया पाठारे,पल्लवी प्रधान, शिल्पा नवलकर, नियती राजवाडे, अदिती सारंगधर, वनश्री पांडे, सुलेखा तळवलकर, रोहिणी निनावे, कांचन अधिकारी, नितु जोशी, डॉ पूर्णिमा म्हात्रे, रेखा सहाय, वनिता कुंभारे, सोनल खानोलकर यांनी हजेरी लावली. सगळ्या खूप सुंदर दिसत होत्या.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या