मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'..म्हणून मी हे यश मिळवू शकले' अपूर्वानं पुरस्कार मिळाल्यानंतर सांगितला रात्रीसं खेळचा 'तो' अनुभव

'..म्हणून मी हे यश मिळवू शकले' अपूर्वानं पुरस्कार मिळाल्यानंतर सांगितला रात्रीसं खेळचा 'तो' अनुभव

 अपूर्वाला तिच्या एका नाटकासाठी पुरस्कार मिळाला आहे. या नाटकाचे प्रयोग आणि रात्रीस खेळ चाले या मालिकेचे शुटींग करत असताना आलेला अनुभव आज एका पोस्टच्या माध्यमातून तिनं चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

अपूर्वाला तिच्या एका नाटकासाठी पुरस्कार मिळाला आहे. या नाटकाचे प्रयोग आणि रात्रीस खेळ चाले या मालिकेचे शुटींग करत असताना आलेला अनुभव आज एका पोस्टच्या माध्यमातून तिनं चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

अपूर्वाला तिच्या एका नाटकासाठी पुरस्कार मिळाला आहे. या नाटकाचे प्रयोग आणि रात्रीस खेळ चाले या मालिकेचे शुटींग करत असताना आलेला अनुभव आज एका पोस्टच्या माध्यमातून तिनं चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

  मुंबई, 9 जून- शेंवता या भूमिकेमूळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर  ( Apurva Nemlekar ) महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. या भूमिकेमुळे तिला एक ओळख मिळाली. मात्र मालिकेच्या सेटवर मिळालेली चूकीची वागणूक यामुळे अपूर्वाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अपूर्वा अनेक प्रोजेक्टमध्ये दिसली. आता अपूर्वाला तिच्या एका नाटकासाठी पुरस्कार मिळाला आहे. या नाटकाचे प्रयोग आणि रात्रीस खेळ चाले या मालिकेचे शुटींग करत असताना आलेला अनुभव आज एका पोस्टच्या माध्यमातून तिनं चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 'इब्लिस' नाटकात अपूर्वानं साकारलेल्या जुई' या भूमिकेला 'सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा 2022' यांच्याकडून 'उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री' चा पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल आनंद व्यक्त करत तिनं एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं म्हटलं आहे की, नुकत्याच पार पडलेल्या 'सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा 2022' मध्ये 'इब्लिस' नाटकातील माझ्या 'जुई' या भूमिकेला 'उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री' चा पुरस्कार मिळाला...या नाटकात माझ्या वाट्याला 'जुई' हीं भूमिका आली होती ती मी प्रामाणिकपणे पार पाडली व त्याचे सार्थक झाल्याचे आज वाटते आहे. 2019 मध्ये 'इब्लिस' नाटकाचे प्रयोग धूमधडक्यात सुरु झाले होते.उत्तम कथानक, कल्पक मांडणी वं दिग्दर्शनं,आणि निवडक कलाकारांच्या अभिनयानें 2019 मध्ये काही मोजकेच प्रयोग झाले.. आणि कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे प्रयोग थांबवावे लागले होते.. वाचा-श्रेया बुगडेला जडलंय या गोष्टीचं महाभयंकर व्यसन, काही केलं तरी सुटता सुटेना अल्पावधीतच हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले व त्यांनी ह्या नाटकास डोक्यावर घेतले..त्याचवेळी 2019 मध्ये रात्रीस खेळ चाले-2, ही मालिका सुद्धा चाहत्यांनी यशाच्या शिखरावर नेऊन ठेवली होती.. त्यातच *इब्लिस* सारखं नाटक मुंबई, पुणे, गोवा, पश्चिम महाराष्ट्र मध्ये सुरु होत..!कष्टाला पर्याय नाही अशी मनाशी खूणगाठ बांधलेली मीं दर शनिवारी, रविवारी रात्रीसं खेळ चाले मालिकेच शूटिंग पूर्ण करून सावंतवाडी वरून रांत्रदिवस रेल्वेनें प्रवास करून नाटकाचे प्रयोग सादर करत होते..त्यास आपण सर्वांनी रसिकतेनें दाद दिल्यामुळे या यशाचे मी धनी होऊ शकले.....! वाचा-थेटरात जाळ आणि धूर संगटच; 'वाय'चा नवा टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली दोन वर्ष कोरोना मुळे नाट्य स्पर्धेला वाव मिळाला नव्हता. परंतु सांस्कृतिक कलादर्पण नें 2019 मध्ये बंद झालेल्या नाटकाला चालू वर्षीचे 2022 च्या स्पर्धेत भाग दिला ,आणि इब्लिस नाटकाला उत्कृष्ट नाटक, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट अभिनेता, उकृष्ट सहाय्यक अभिनेता, उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, उत्कृष्ट नेपथ्य, उत्कृष्ट रंगभूषा , उत्कृष्ट प्रकाशयोजना अशी नऊ नामांकने जाहीर केली..!
  आणि विलंबाने का होईना या कलाकृतीला न्याय मिळाला..आणि या स्पर्धेत इब्लिस नाटकालाउत्कृष्ट नाटक,उत्कृष्ट अभिनेता- वैभव मांगले,उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- अपूर्वा नेमळेकर,उत्कृष्ट नेपथ्य - संदेश बेंद्रे यांना पुरस्कार मिळाले .त्यामुळे मला मिळालेल्या या पुरस्काराने मीं भारावून गेले, आणि केलेल्या कष्टाच फळं मिळाल्याचा, आणि माझ्या कष्टाचे चीज झाल्याचा खूप आनंद झाला..त्यामुळे मी मान्यवर परीक्षक आणि मायबाप प्रेक्षकयांचे मी खूप खूप आभारी आहे..!🙏🙏🙏🙏 अपूर्वाच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या