चंद्रकांतदादा भाषणाच्या यादीतून अजितदादांचं नाव गायब कसं झालं? मोदींच्या भाषणाने देश चालत नाही, दिपाली सय्यद यांचं टीकास्त्र
चंद्रकांतदादा भाषणाच्या यादीतून अजितदादांचं नाव गायब कसं झालं? मोदींच्या भाषणाने देश चालत नाही, दिपाली सय्यद यांचं टीकास्त्र
देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमामध्ये (pm narendra modi inauguration of sant tukaram temple) राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना न बोलू दिल्याचा प्रकार घडला होता. त्यांनतर सोशल मीडियावर एकच खळबळ माजली होती.
मुंबई, 17 जून- देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमामध्ये (pm narendra modi inauguration of sant tukaram temple) राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना न बोलू दिल्याचा प्रकार घडला होता. त्यांनतर सोशल मीडियावर एकच खळबळ माजली होती. या सर्व प्रकारावर सोशल मीडियावर विविध माध्यमातून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. अनेकांनी सोशल मीडियावर आपलं मत मांडलं होतं. त्यांनतर आता शिवसेना नेत्या आणि मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी या विषयावर ट्विट करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
दीपाली सय्यद या सतत सोशल मीडियावरून विरोधी पक्षाला प्रश्न विचारत असतात. शिवाय त्यांच्या प्रश्नांना सणसणीत उत्तरेदेखील देत असतात. त्या ट्विटरवर सतत ट्विट करत आपलं मत मांडत असतात. आजही त्यांनी ट्विट करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना प्रश्न विचारला आहे. देहू येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगाबाबत दीपाली यांनी प्रश्न विचारला आहे.
चंद्रकांतदादा भाषणाच्या यादीतुन अजितदादांचे नाव गायब झाले कसे?स्थानिक प्रतिनीधींचे पासेस कुठे?तुम्ही स्टेजवर मग स्थानिक प्रतिनीधींना अशीवागणुक का? मोदींच्या बोलण्याने देशचालत नाहीआणि फडणवीसांनी मोठेपणाकरून ते मोठे होत नाहीत.PMO ने माफी मागा हिभाजपाची सभा नव्हे जनतेला उत्तर द्या!
दीपाली सय्यद ट्विट-
दीपाली सय्यद यांनी ट्विट करत लिहिलंय, ''चंद्रकांतदादा भाषणाच्या यादीतुन अजितदादांचे नाव गायब झाले कसे?स्थानिक प्रतिनीधींचे पासेस कुठे?तुम्ही स्टेजवर मग स्थानिक प्रतिनीधींना अशीवागणुक का? मोदींच्या बोलण्याने देशचालत नाही आणि फडणवीसांनी मोठेपणा करून ते मोठे होत नाहीत.PMO ने माफी मागा हि भाजपाची सभा नव्हे जनतेला उत्तर द्या''! त्यांच्या या ट्विटमुळे पुन्हा सोशल मीडियावर नवी चर्चा सुरु झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.