Home /News /entertainment /

माझ्या आयुष्यातले सैराट दिवस म्हणतं अमृता सुभाषनं शेअर केले Throwback Pic, कोंकणा सेनच्या कमेंटनं वेधलं लक्ष

माझ्या आयुष्यातले सैराट दिवस म्हणतं अमृता सुभाषनं शेअर केले Throwback Pic, कोंकणा सेनच्या कमेंटनं वेधलं लक्ष

अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष हिन मेजर थ्रोबॅक ( Major throwback ) म्हणत तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर (Amruta Subhash throwback Photos) काही अभिनेत्रींच्या कमेंट या लक्षवेधी ठरत आहेत.

  मुंबई, 26 मे- आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष  (Amruta Subhash ) होय. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये अमृता सुभाषचे नाव घेतले जाते. अमृता सुभाषने मालिका, चित्रपट आणि नाटक आणि वेब सीरीज या चार माध्यमांमध्ये काम केले आहे. या माध्यमांद्वारे अमृता सुभाष वेगवेगळ्या भूमिकातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अमृता सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असते. तिनं नुकतेच तिचे काही मेजर थ्रोबॅक ( Major throwback ) म्हणत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर  (Amruta Subhash  throwback Photos)  काही अभिनेत्रींच्या कमेंट या लक्षवेधी ठरत आहेत. अमृता सुभाषनं माझ्या आयुष्यातले सैराट दिवस म्हणतं शेअर केले काही मेसर थ्रोबॅक फोटो. या फोटोंना तिनं सुंदर कॅप्शन देखील दिली आहे. तिनं म्हटलं आहे की, माझ्या आयुष्यातले #सैराट दिवस! “बदलून गेलया सारं ऽऽऽ”गिरीश जोशी ..या मौल्यवान फोटोसाठी धन्यवाद! ही कोण आहे ओळखलंत का मंडळी?पुढच्या फोटोतील माननीय सूर्यकांत मांढरे यांना सादर प्रणाम ..तिचा हा मेजर थ्रोबॅक पाहून मराठीसह बॉलिवूड अभिनेत्रींनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे. परक पोलक्यात अमृता खूपच निरागस आणि तितकीच क्यूट दिसत आहे.
  अमृताचे जुने फोटो पाहून अभिनेत्री प्लाबिता बोरठाकुर, कोंकणा सेन, पर्णा पेठ या अभिनेत्रींनी कमेंट करत अमृताच्या या फोटोंचे कौतुक केलं आहे. या सगळ्यात अभिनेत्री कोंकणा सेनची कमेंट मात्र सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. तिनं म्हटलं आहे की, किती ते क्यूट...सेलेब्सप्रमाणे चाहत्यांनी देखील तिच्या या फोटोववर कमेंटचा वर्षाव केला आहे. वाचा-नायक नायिका नाही तर 'हे' आजी आजोबा गाजवतायत छोटा पडदा अमृता सुभाषने ‘श्वास’, ‘सावली’, ‘वळू’, ‘त्या रात्री पाऊस होता’, ‘गंध’, ‘मसाला’, ‘चिंतामणी’, ‘रझाकार’, ‘किल्ला’, ‘झिपऱ्या’ या मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. अमृताने मराठी बरोबरच हिंदी चित्रपटातसुद्धा काम केले. झोया अख्तर दिग्दर्शित ‘गल्ली बॉय’ या चित्रपटात तिने रणवीर सिंहच्या आईची भूमिका साकारली. तसंच तिने अनुराग कश्यप यांच्या ‘चोक्कड’ चित्रपटातही काम केलेय. तसेच अमृताने सेक्रेड गेम्स या नेटफ्लिक्सच्या पहिल्या वेब सिरीजच्या दुसर्‍या सिझनमध्ये कुसुम देवी यादव ही व्यक्तिरेखा साकारली होती.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या