Home /News /entertainment /

अभिनेत्री अमृता सुभाषला स्वतःच्या बर्थडेपेक्षा नवऱ्यानं काढलेल्या फोटोचं जास्त कौतुक; म्हणाली, 'हा वाढदिवस...'

अभिनेत्री अमृता सुभाषला स्वतःच्या बर्थडेपेक्षा नवऱ्यानं काढलेल्या फोटोचं जास्त कौतुक; म्हणाली, 'हा वाढदिवस...'

13 मे रोजी अमृताचं वाढदिस असतो. तिनं यंदा निसर्गाच्या सानिध्यात तिच्या (Amruta Subhash Birthday) खास मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला.

  मुंबई, 16 मे- आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष होय. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये अमृता सुभाषचे नाव घेतले जाते. अमृता सुभाषने मालिका, चित्रपट आणि नाटक आणि वेब सीरीज या चार माध्यमांमध्ये काम केले आहे. या माध्यमांद्वारे अमृता सुभाष वेगवेगळ्या भूमिकातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 13 मे रोजी अमृताचं वाढदिस असतो. तिनं यंदा निसर्गाच्या सानिध्यात तिच्या (Amruta Subhash Birthday) खास मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडिओ देखील तिनं पोस्ट केला आहे. आता वाढदिवसानंतर तिनं एक पोस्ट केली आहे, यामध्ये तिनं सर्वांचे आभार मानले आहेत. शिवाय तिच्या नवऱ्याने काढलेले काही फोटो शेअर करत त्याचे देखील कौतुक केलं आहे. अमृता सुभाषनं सोशल मीडियावर तिच्या नवऱ्याने काढलेले सुंदर फोटो शेअर केले आहेत. शिवाय या पोस्टमध्ये तिनं म्हटलं आहे की, माझ्या वाढदिवशी तुम्ही सर्वांनी माझ्यावर शुभेच्छांचा जो वर्षाव केलात त्यासाठी मनापासून आभार. हे फोटो माझ्या वाढदिवशी माझा नवरा संदेशने काढले. हा वाढदिवस मी माझ्या काही जिवलग मित्रमैत्रिणी आणि हिरवीगार झाडं, निसर्ग..यांच्यासोबत घालवला. मी आनंदात होते आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमाने माझा आनंद द्विगुणित झाला. कृतज्ञता.💕 तिच्या या पोस्टवर पुन्हा एकदा चाहत्यांनी दिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खरं तर तिला तिच्या वाढदिवसापैकी तिच्या नवऱ्यानं काढलेल्या फोटोंच जास्त कौतुक असल्याचे दिसत आहे. का आसायला नको, ती या फोटोत सुंदर दिसत आहे.तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही सांगून जातो. अमृता नेहमीच सोशल मीडियावर तिच्या कुटुंबासोबत फोटो शेअर करत असतेय. तसेच संदेशच देखील कौतुक करत असते. अमृता सुभाषने प्रेम विवाह केला असून तिच्या नवऱ्याचे नाव संदेश कुलकर्णी आहे. संदेश कुलकर्णी लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. संदेश आणि अमृताने बऱ्याच वेळा एकत्र काम केलेलं आहे. अमृताच्या यशस्वी वाटचालीत नवरा संदेश नेहमी तिच्यासोबत उभा राहिला आहे.
  अमृता सुभाषने ‘श्वास’, ‘सावली’, ‘वळू’, ‘त्या रात्री पाऊस होता’, ‘गंध’, ‘मसाला’, ‘चिंतामणी’, ‘रझाकार’, ‘किल्ला’, ‘झिपऱ्या’ या मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. अमृताने मराठी बरोबरच हिंदी चित्रपटातसुद्धा काम केले. झोया अख्तर दिग्दर्शित ‘गल्ली बॉय’ या चित्रपटात तिने रणवीर सिंहच्या आईची भूमिका साकारली. तसंच तिने अनुराग कश्यप यांच्या ‘चोक्कड’ चित्रपटातही काम केलेय. तसेच अमृताने सेक्रेड गेम्स या नेटफ्लिक्सच्या पहिल्या वेब सिरीजच्या दुसर्‍या सिझनमध्ये कुसुम देवी यादव ही व्यक्तिरेखा साकारली होती.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या