मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मराठमोळ्या अमृता सुभाषच्या अभिनयाचा जगभरात डंका; या भूमिकेसाठी मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मराठमोळ्या अमृता सुभाषच्या अभिनयाचा जगभरात डंका; या भूमिकेसाठी मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मराठीसोबतच हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष (Amruta Subhash ).अमृता सुभाषला पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार( internarional award)   मिळाला आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 4 डिसेंबर- मराठीसोबतच हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष (Amruta Subhash ).अलिकडेच प्रदर्शित झालेल्या बॅाम्बे बेगम्स या सिरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष, पूजा भट्ट, आध्या आनंद, प्लाबिता बोरठाकुर, शाहाना गोस्वामी या तकड्या अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसल्या होत्या. या सीरिजमधील भूमिकेसाठी अमृता सुभाषला पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार( internarional award)   मिळाला आहे. देशासाठी खऱचं ही अभिमानास्पद गोष्ट आहे. अमृताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. सोबतच बॅाम्बे बेगम्सच्या टीमचे आभार देखील मानले आहेत.

अमृता सुभाषने इन्स्टावर यासंबंधी व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की,पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार. माझ्या बॅाम्बे बेगम्सच्या टीमचे आभार. या एशियन पुरस्कारासाठी भारताचं प्रतिनिधित्व करणं हा भारावून टाकणारा अनुभव होता..हा मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव होत. बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्टने देखील तिचं अभिनंदन करत कौतुक केले आहे. अनेक बॉलिवूड कलाकरांसह चाहत्यांकडून तिचं अभिनंदन केलं जात आहे.

यासोबतच तिनं दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एशियन अॅकॅडमी क्रिएटीव्ह पुरस्कारांच्या नॅशनल विजेतेयांची अॅानलाईन कॅानफरन्स होती. योको नाराहाशी या जपानमधल्या कास्टींग डीरेक्टरनं आम्हा नॅशनल विजेत्यांची मुलाखत घेतली. भारतातून मी आणि कोंकणा सेन शर्मा यांनी या कॅानफरन्समधे भाग घेतला.❤️

वाचा : 'मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही '#BanLipstick'; तेजस्विनी पंडितच्या VIDEO ने उडाली खळबळ

पूजा भट्टची बॉम्बे बेगम्स ही वेबसिरीज 8 मार्च 2021 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. या वेबसिरीजमध्ये पूजा भट्टने पहिल्यांदा डिजिटल विश्वात पाऊल ठेवलं आहे. पूजा भट्टसोबत या सीरिजमध्ये मराठमोली अभिनेत्री अमृता सुभाष देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. अमृता मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये तिनं उत्कृष्ट अभिनयाच्या जीवावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. रणवीर सिंहच्या गली बॉयमध्ये अमृता मुरादच्या आईच्या भूमिकेत दिसली होती, तर तिने नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्स 2 या मध्येही महत्त्वाची भूमिका साकारली होती. बॉम्बे बेगम्समध्ये अमृता बार डान्सरच्या भूमिकेत दिसली होती.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Marathi actress, Marathi entertainment