मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाला Filmfare Award, पाहा यंदा कोणी मारली बाजी

मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाला Filmfare Award, पाहा यंदा कोणी मारली बाजी

65व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मराठमोळ्या अभिनेत्रीला तिच्या दमदार अभिनयासाठी सन्मानित करण्यात आलं.

  • Share this:

मुंबई, 16 फेब्रुवारी : हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कारचा वितरण सोहळा शनिवारी आसामच्या गुवाहाटीमध्ये पार पडला. लवकरच तो टीव्हीवरही प्रदर्शित केला जाणार आहे. दरम्यान, 65व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मराठमोळ्या अभिनेत्रीला तिच्या दमदार अभिनयासाठी सन्मानित करण्यात आलं.

अभिनेत्री अमृता सुभाषला गल्ली बॉय चित्रपटासाठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. अमृता सुभाषने गल्ली बॉय चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट सोबत स्क्रीन शेअर केली होती. दोन दिग्गज कलाकार असतानाही अमृतानं आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली.

Lakme Fashion Week 2020 जान्हवी की सनी लिओनी कुणाचा कॅटवॉक बेस्ट?

चित्रपटात उत्तम संवाद आणि तरुणांच्या पसंतीस उतरतील अशी रॅप साँग असतानाही अमृतानं आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला. त्यामुळेच 65व्या फिल्मफेअरमध्ये अमृताला 'ब्लॅक लेडी'ची कमाई करता आली आहे. दरम्यान, 65व्या फिल्मफेअरमध्ये झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय'ने सर्वोत्कृष्ट चित्रपटचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावत तब्बल १० फिल्मफेअर पुरस्कार आपल्या नावे केले.

VIDEO : ‘प्रेम म्हणजे थप्पड मारण्याचं लायसन्स नाही’, तापसीचा व्हिडिओ व्हायरल

यात खालील पुरस्कारांचा समावेश आहे...

सर्वोत्कृष्ट सिनेमा : गली बॉय

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीः आलिया भट (गली बॉय)

सर्वोत्कृष्ट अभिनेता: रणवीर सिंह, (गली बॉय)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकः झोया अख्तर, (गली बॉय)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीः अमृता सुभाष, (गली बॉय)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताः सिद्धांत चतुर्वेदी, (गली बॉय)

सर्वोत्कृष्ट पटकथा: रीमा कागती, जोया अख्तर, (गली बॉय)

सर्वोत्कृष्ट संवादः विजय मौर्या, (गली बॉय)

सर्वोत्कृष्ट अल्बमः गली बॉय आणि कबीर सिंह

सर्वोत्कृष्ट गीतः डिव्हाइन अँड अंकुर तिवारी - अपना टाइम आयेगा (गली बॉय)

बॉलिवूड गाण्यावर निक जोनासचा धम्माल डान्स, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2020 08:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading