मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ओळखा पाहू ही लहान मुलगी आहे तरी कोण? आज करतेय मराठी सिनेसृष्टीवर राज्य

ओळखा पाहू ही लहान मुलगी आहे तरी कोण? आज करतेय मराठी सिनेसृष्टीवर राज्य

 मराठी चित्रपटसृष्टीत(Marathi Actress) एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून अमृता सुभाषला (Amruta Subhash) ओळखलं जातं.

मराठी चित्रपटसृष्टीत(Marathi Actress) एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून अमृता सुभाषला (Amruta Subhash) ओळखलं जातं.

मराठी चित्रपटसृष्टीत(Marathi Actress) एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून अमृता सुभाषला (Amruta Subhash) ओळखलं जातं.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 13 मे-  मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Actress) एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून अमृता सुभाषला (Amruta Subhash) ओळखलं जातं. ही अभिनेत्री आज तब्बल 42 वर्षांची झाली आहे. आपली ही लाडकी अभिनेत्री बालपणी कशी होती, हे आपण पाहणार आहोत. अमृताने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपला एक बालपणीचा फोटो (Childhood Pic) शेयर केला होता. यामध्ये ती आपल्या आईसोबत दिसून येत आहे.

अमृता सुभाषने आजपर्यंत अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांत काम केलं आहे. अमृता ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती सुभाष यांची मुलगी आहे. त्यामुळे आपल्या आईकडूनचं तिला अभिनयाचा वारसा मिळाला आहे. अमृताला बालपणापासूनचं अभिनयाची आवड होती. त्यामुळे तिने ‘नशनल स्कुल ऑफ ड्रामा’ दिल्ली मधून आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. अमृताने बऱ्याच वेळा सांगितलं आहे. की आईला बघूनचं तिला अभिनयाची गोडी लागली आहे.

अमृता आणि आईमध्ये खुपचं छान नात आहे. त्या दोघींचे सतत काही ना काही किस्से ऐकायला मिळत असतात. नुकताच अमृताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला बालपणीचा फोटो शेयर केला होता. यामध्ये ती आपल्या आईसोबत दिसून येत आहे. या फोटोमध्ये अमृता खूपच गोंडस दिसत आहे. ही छोटीशी अमृता आज एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नावारूपाला आली आहे. अमृता आज आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे.

(हे वाचा: ओळखा पाहू ही चिमुरडी आहे तरी कोण? आज आहे मराठीतील Bold अभिनेत्री)

अमृताने 2004 मध्ये ‘श्वास’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल होतं. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर ऑस्कर नॉमिनेशन मिळणारा हा पहिला भारतीय चित्रपट होता. त्यानंतर अमृताला ‘अस्तु’ या चित्रपटासाठी ‘उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा’ राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

(हे वाचा:रामगोपाल वर्मांचा Dangerous: पहिल्या 'समलैंगिक' थ्रिलर चित्रपटाचा trailer )

अमृताने आपल्या आई सोबतही बऱ्याच चित्रपटांत काम केलं आहे. वळू, आजी, मसाला, गंध अशा अनेक चित्रपटात ती आईसोबत झळकली होती. तसेच अमृताने हिंदीमध्ये सुद्धा काम केल आहे. रणवीर सिंगच्या ‘गल्ली बॉईज’ या चित्रपटात तिने रणवीरची आई साकारली होती. तर ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजमध्ये सुद्धा अमृताने काम केलं आहे. यामध्ये तिच्या अभिनयाचं खूप कौतुक देखील झालं होतं. अशा या दमदार अभिनेत्रीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment