Home /News /entertainment /

Video : सारा अली खानच्या 'चकाचक' गाण्यावर अमृता खानविलकरचा ढिंच्याक स्वॅग

Video : सारा अली खानच्या 'चकाचक' गाण्यावर अमृता खानविलकरचा ढिंच्याक स्वॅग

बॉलिवू़ड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan)चा आगामी चित्रपट अतरंगी रे (Atrangi Re)मधील 'चकाचक' (Chakachak) गाणे सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहे.

  मुंबई, 14 डिसेंबर - बॉलिवू़ड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan)चा आगामी चित्रपट अतरंगी रे (Atrangi Re)मधील 'चकाचक' (Chakachak) गाणे सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. माधुरी दीक्षितपासून रणवीर सिंगपर्यंत साराच्या या गाण्यावर सर्वांनीच इन्स्टा रील केले आहेत. या गाण्यावर सेलब्सपासून कॉमन मॅन पर्यंत सर्वच रिल्स बनवत आहेत. आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील (Amruta Khanvilkar)या गाण्यावर भन्नाट रील बनवलं आहे. तिने तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला खूप पसंती मिळताना दिसते आहे. यामध्ये अमृता खानविलकरचा ढिंच्याक स्वॅग पाहायला मिळत आहे. अमृता खानविलकर तिच्या अभिनयाप्राणे तिच्या डान्सिंग स्कीलमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर ती विविध गाण्यावर रील बनवत असते. नुकतेच तिनं सारा अली खानच्या 'चकाचक' या गाण्यावर रील बनवलं आहे. चाहत्यांकडून याला चांगलीच पसंती मिळत आहे. अमृताने पिवळ्या रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचा पफवाला ब्लाउज घातला आहे. कानात मोठे इअरिंग्स यामुळे ती खूपच सुंदर दिसते आहे. तसेच तिने गॉगलदेखील लावलेला दिसतो आहे. वाचा : सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतून या अभिनेत्रीची एक्झिट, कारण आलं समोर अमृताच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. फक्त चाहतेच नाही तर सेलिब्रेटीदेखील तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत आहेत. अभिनेत्री सोनाली खरेने कमेंटमध्ये लिहिले आहे की, एकदम चका चक... अभिनेत्री मृणाल ठाकूरने म्हटले उफ्फ..ही साडी आणि तू... तर एका चाहत्याने लिहिले की, तोड नाही अमृता तुला..तर आणखी एका युजरने म्हटले की, सारा अली खानपेक्षा तू जास्त छान डान्स या गाण्यावर केला आहेस.
  अमृताने चकाचक गाण्यावरील रिल शेअर करत लिहिले की, जेव्हा तुम्हाला तुमच्या आवडत्या साडीला गुडबाय म्हणायचे असते तेव्हा कारण आज हळदी आहे भाईईई. अमृता खानविलकर अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा बॉयफ्रेंड विकी जैनच्या लग्नासाठी गेली आहे. तिथले सर्व सेरेमनीमध्ये ती सहभागी झाली आहे. अंकिता आणि विकीची हळद समारंभासाठी ती पिवळ्या साडीत छान तयार झाली होती. तिच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे देखील या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. अमृता आणि अभिज्ञा अंकिता लोखंडेच्या लग्नातील सर्व कार्यक्रम एन्जॉय करताना दिसत आहेत. या दोघींने एकापेक्षा एक भन्नाट रील शेअर केले आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या