अमृता-सोनालीने दिला Friendship Goal; धम्माल डान्स VIDEO होतोय VIRAL

अमृता-सोनालीने दिला Friendship Goal; धम्माल डान्स VIDEO होतोय VIRAL

अभिनेत्री अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar) आणि सोनाली खरे(Sonali Khare) या दोघीही खूपच घट्ट मैत्रिणी आहेत.

  • Share this:

मुंबई, 8 जून-  मनोरंजन क्षेत्रात जितकी चढाओढ पाहायला मिळते. तितकीच चांगली मैत्रीसुद्धा दिसून येते. मराठी चित्रपटसृष्टीतील ( Marathi Film Industry) अशीच एक जोडगोळ म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar) आणि सोनाली खरे(Sonali Khare). या दोघीही खूपच घट्ट मैत्रिणी आहेत. त्या दोघी सतत एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसून येतात.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

नुकताच अमृता खानविलकरने आपला एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे, यामध्ये ती आपली बेस्ट फ्रेंड सोनाली खरे आणि तिची मुलगी सनाया आनंदसोबत दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये या तिघीही धम्माल डान्स करताना दिसत आहेत. या तिघींनीही व्हाईट कलरचा टी शर्ट आणि खाली डेनिम घातला आहे. तर दुसऱ्या सीनमध्ये काळ्या रंगाचा एक्सरसाईज ड्रेस परिधान केला आहे. या दोन्ही ड्रेसमध्ये या तिघीही खुपचं सुंदर दिसत आहेत.

(हे वाचा: 'आमचं घर आहे संकटात', प्राजक्ता माळीनं चाहत्यांना केली मदतीची विनंती  )

सध्या अमृता आणि सोनाली सुट्टीचा आनंद घेत आहेत. त्यांच्यासोबत सोनालीची मुलगी देखील आहे. या दोघींनी एकत्र येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय. याआधीही सोनाली आणि अमृताने एकत्र सुट्टीचा आनंद घेतला आहे. या दोघी खूपच घट्ट मैत्रिणी आहे. काही महिन्यांपूर्वीच या दोघी मालदीवला गेल्या होत्या. मालदीवमध्ये सुद्धा या दोघींनी धम्माल मस्ती केली होती. यावेळी अमृताची आईसुद्धा यांच्यासोबत होती. मालदीवचे भरपूर फोटो या दोघींनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

(हे वाचा:VIDEO: समरचा डाव यशस्वी; 'पाहिले नं मी तुला' मालिकेत नवा ट्विस्ट   )

अमृता खानविलकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. ती सतत नवनवीन उपक्रमातून चाहत्यांच्या भेटीला येत असते. नुकताच अमृताचा फिटनेस फंडा चर्चेत होता. ती लॉकडाऊनमध्ये योगावर लक्ष केंद्रित केल्याचं दिसून आलं होतं. तर दुसरीकडे तिची मैत्रीण आणि अभिनेत्री सोनाली खरे चित्रपटांपासून दूर आहे. मात्र तीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे.

Published by: Aiman Desai
First published: June 8, 2021, 6:25 PM IST

ताज्या बातम्या