मुंबई, 17 जुलै- छोट्या पडद्यावर लवकरच ‘जय भवानी जय शिवाजी’ (Jay Bhavani Jay Shivaji) ही मालिका आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहते खुपचं उत्सुक आहेत. छत्रपती शिवाजी महराजांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानलं जातं. स्वराज्य स्थापनेमध्ये अनेक शिलेदारांनी महाराजांना साथ दिली आहे. स्वराज्याच्या याचं शिलेदारांच्या शौर्याचा इतिहास सांगण्यासाठी ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका येत आहे. अजिंक्य देव, कश्यप परुळेकर नंतर आत्ता अभिनेता विशाल निकमची (Vishal Nikam) भूमिकासुद्धा समोर आली आहे. अभिनेता विशाल निकम यामध्ये शिवा काशिद (Shiva Kashid) यांची भूमिका साकारणार आहे.
View this post on Instagram
स्टार प्रवाहवर लवकरच ‘जय भवानी जय शिवाजी’ ही शौर्यगाथा सुरु होणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला या मालिकेची उत्सुकता लागून राहिली आहे. याआधी या मालिकेत अभिनेता अजिंक्य देव बाजीप्रभूंची भूमिका साकारणार असल्याचं, तर अभिनेता कश्यप परुळेकर नेताजी पालकरची भूमिका साकारणार असल्याचं समजलं होतं. आत्ता मराठी मालिकांमधील प्रसिध्द अभिनेता विशाल निकम ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेमध्ये शिवा काशिद यांची भूमिका साकारणार असल्याचं समजलं आहे. या अभिनेत्याचा मालिकेतील लुकसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
(हे वाचा:'तारक मेहता...' दिलीप जोशींच्या आधी 'या' कलाकरांना मिळाली होती जेठालालची ऑफर )
या मालिकेसाठी सर्वांनाचं मोठी उत्सुकता लागली आहे. ही मालिका येत्या 26 जुलैपासून स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे. याआधी विशाल निकम ‘दक्खनचा राजा जोतीबा’ या मालिकेमध्ये झळकला होता. या मालिकेचं शुटींग कोल्हापूरच्या चित्रनगरीमध्ये सुरु होतं. या मालिकेतील जोतीबा देवाच्या भुमिकेसाठीसुद्धा अभिनेता विशाल निकमने खुपचं मेहनत घेतली होती. आत्ता पुन्हा एकदा अशाच ऐतिहासिक मालिकेमध्ये तो महाराजांचा शिलेदार शिवा काशिद यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment, TV serials