मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रणबीर-आलियानंतर आता ही लोकप्रिय जोडी अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर लग्नपत्रिका व्हायरल

रणबीर-आलियानंतर आता ही लोकप्रिय जोडी अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर लग्नपत्रिका व्हायरल

 सध्या सगळीकडं रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या (alia and ranbir wedding ) लग्नाची चर्चा आहे. आता या जोडी पाठोपाठ मनोरंजन विश्वातील आणखी एक लोकप्रिय जोडी लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 13 एप्रिल- सध्या सगळीकडं रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या (alia and ranbir wedding ) लग्नाची चर्चा आहे. आता या जोडी पाठोपाठ मनोरंजन विश्वातील आणखी एक लोकप्रिय जोडी लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. या दोघांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही जोडी म्हणजे दुसरी तिसरी कोण नसून विराजस कुलकर्णी (Virajs Kulkarni) आणि शिवानी रांगोळे (Shivani Rangole) यांची आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीतील क्यूट कपल म्हणून विराजस कुलकर्णी (Virajs Kulkarni) आणि शिवानी रांगोळे (Shivani Rangole) यांना ओळखलं जातं. या दोघांनी कधीच आपलं नातं कुणापासून लपवलेलं नाही. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी साखरपुडा केला होता. चाहत्यांना या (Virajs Kulkarni Shivani Rangole Wedding) दोघांच्या लग्नाबद्दल उत्सुकता लागली होती. आता या दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. 7 मे 2022 ला ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. एका पोर्टलनं देखील याबद्दला माहिती दिली आहे. मात्र अद्याप लग्न कुठं असणार याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. चाहत्यांच्या मात्र आनंदाचे वातावरण आहे.

वाचा-'या' बालशिवाजीस ओळखलं का? आता साकारतोय 'शेर शिवाजी' सिनेमात महत्त्वाची भूमिक!

'डावीकडून चौथी बिल्डिंग' या विराजसच्या नाटकात शिवानीनं अभिनय केला होता. तेव्हाच त्यांची ओळख झाली. विराजसनं 'होस्टेल डेज' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. विराजस फक्त अभिनेता नाही तर तो एक दिग्दर्शकही आहे. 'अनाथेमा' या नाटकात त्यांनं अभिनयाबरोबर दिग्दर्शनाचीही जबाबदारी स्वीकारली होती. तसंच रमा माधव चित्रपटासाठी मृणाल कुलकर्णी यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होत. याशिवाय मिकी, डावीकडून चौथी बिल्डिंग, भंवर यासारख्या काही नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शनही त्याने केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by (@marathiserials_official)

'थेटर ऑन एंटरटेनमेंट' ही विराजसची निर्मिती संस्था असून त्याने अनेक नाटकांची निर्मिती देखील केली आहे.तर ‘बनमस्का’ मालिकेमुळे शिवानी रांगोळे हे नाव घराघरांत पोहोचलं. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. त्यामध्ये 'सांग तू आहेस ना' ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या प्रमुख मालिकांचा समावेश आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Entertainment, Marathi entertainment, Ranbir kapoor