विजय चव्हाणांची ही इच्छा अपुरीच राहिली

विजय चव्हाणांची ही इच्छा अपुरीच राहिली

प्रकृती स्वास्थ्यामुळे गेली अनेक महिने ते रंगभूमी आणि मोठ्या पडद्यापासून दूर होते

  • Share this:

मुंबई, २४ ऑगस्ट- चार दशकांहूनही अधिक काळ नानाविध भूमिका साकारून रसिकांना खळखळवून हसवणारा चतुरस्त्र नट आज काळाच्या पडद्या आड गेला. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती स्वास्थ्यामुळे गेली अनेक महिने ते रंगभूमी आणि मोठ्या पडद्यापासून दूर होते. पण पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करायची त्यांनी इच्छा बोलून दाखवली होती. त्यांची ही इच्छा मात्र अपूर्णच राहिली.

चार महिन्यांपूर्वी विजय चव्हाण यांना चित्रपती व्ही. शांताराम पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांना पुरस्कार प्रदान केला. पुरस्कार सोहळ्यावेळी ते आजारी होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता. मात्र तरीही ते पुरस्कार सोहळ्यासाठी आवर्जुन उपस्थित राहिले. या पुरस्कार सोहळ्यात त्यांनी अनेक भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला.

विजय चव्हाण बालपणी बाबांनी जबरदस्ती संभाजीची भूमिका करायला लावली होती. तेव्हा पेटाऱ्यात बाबांनी विजय यांना ठेवले आणि ते पेटाऱ्यातच झोपून गेले. जबरदस्ती बाबांनी त्यांना उठवले असता ते अर्ध्या नाटकातून पळून गेले. विजय यांना कधीच अभिनय क्षेत्रात यायचे नव्हते. मात्र तरीही नशिब त्यांना इथे घेऊन आले.

एकांकिका स्पर्धांमध्येही त्यांना काम करायला सांगितले तेव्हा त्यांनी अभिनय न करता कपडे सांभाळण्याचे किंवा मित्र- मैत्रिणींना चहा नेऊन द्यायचे काम स्वीकारले. अखेर मुख्य अभिनेता येऊ न शकल्यामुळे आयत्यावेळी विजय यांना त्यांच्या पाठांतराच्या जोरावर एकांकिकेसाठी उभे करण्यात आले. फक्त एका दिवसात त्यांनी संपूर्ण एकांकिका पाठ करुन सर्व तयारी केली. त्या वर्षी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

आजारपणामुळे अशक्त झाल्याने विजय यांनी नाटक, सिनेमांत काम करणं सोडलं होतं. पूर्ण बरं झाल्यावर जोमाने पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करण्याची इच्छा त्यांनी अनेकांना बोलून दाखवली होती. मात्र त्यांची ही इच्छा अपुरीच राहिली.

VIDEO : हवालदार मामांनी घेतलं हातात फावडं,बुजवले खड्डे

First published: August 24, 2018, 1:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading