मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर, या अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर, या अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ

बॉलविडप्रमाणेच मराठी सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी वर्षाच्या अखेर लग्नगाठ बांधली आहे. अभिनेता विजय आंदळकर  (vijay andalkar ) हा देखील दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे.

बॉलविडप्रमाणेच मराठी सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी वर्षाच्या अखेर लग्नगाठ बांधली आहे. अभिनेता विजय आंदळकर (vijay andalkar ) हा देखील दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे.

बॉलविडप्रमाणेच मराठी सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी वर्षाच्या अखेर लग्नगाठ बांधली आहे. अभिनेता विजय आंदळकर (vijay andalkar ) हा देखील दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे.

मुंबई, 15 डिसेंबर - बॉलविडप्रमाणेच मराठी सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी वर्षाच्या अखेर लग्नगाठ बांधली आहे. अभिनेता विजय आंदळकर  (vijay andalkar ) हा देखील दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. अभिनेत्री रुपाली झनकर  (rupali  zankar)हिच्याशी त्याने लग्नाठ बांधली आहे. इन्स्टावर त्याने (vijay andalkar and  rupali zankar  wedding Photos) लग्नाचे तसेच हळदीचे फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू या झी मराठी वरील मालिकेत काम करत असताना अभिनेत्री रुपाली झनकर हिच्याशी त्याचे प्रेम जुळून आले होते. मेंदी, हळदीचे फोटो रूपालीने व विजयने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. रुपाली झनकर हिने लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू या मालिकेत काजलची भूमिका निभावली होती. मालिकेनिमित्त हे सर्व कलाकार नाशिकलाच काही काळ एकत्रित राहिले होते. त्यानंतर 21 एप्रिल 2021 रोजी त्यांनी एंगेजमेंट करून चाहत्यांना धक्का दिला होता. कारण विजय आंदळकरचे अभिनेत्री पूजा पुरंदरेसोबत अगोदरच लग्न झाले होते.

वाचा: 'तुझ्याकडे फक्त एकच बिकिनी आहे का ?' मालदीव फोटोंमुळे इलियाना ट्रोल

2017 साली पूजा पुरंदरे आणि विजय आंदळकर यांनी मोठ्या थाटात लग्न केले होते. मात्र त्यांचा घटस्फोट झाल्याने अनेक प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता. पूजा पुरंदरेने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत कामिनीची भूमिका साकारली आहे. आता तिनं या मालिकेचा निरोप घेतला आहे.

विजय आंदळकरने वर्तुळ, स्वराज्यरक्षक संभाजी, बाजीराव मस्तानी, 702 दीक्षित, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, गोठ, प्रेमा तुझा रंग कसा या चित्रपट आणि मालिकेतून तो महत्वाच्या भूमिका साकारताना दिसला होता. बहुतेक चित्रपट आणि मालिकेतून तो नकारात्मक भूमिका देखील साकारताना दिसला आहे. रुपाली झनकार ही मूळची नाशिकची आहे. फॅशन जगतात रुपालीने अनेक नवख्या कलाकारांना संधी मिळवून दिली आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Tv serial