2022 वर्षाच्या पहिल्याच महिन्यात स्वप्नील जोशीची चाहत्यांना भेट; केली नवीन घोषणा
2022 वर्षाच्या पहिल्याच महिन्यात स्वप्नील जोशीची चाहत्यांना भेट; केली नवीन घोषणा
अनेक वर्षांपासून मनोरंजनविश्वात अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या स्वप्नील जोशीची (Swapnil Joshi) लोकप्रियता प्रचंड आहे. लवकरच तो टीव्हीवर म्हणजे मालिका विश्वात पदार्पण करणार आहे.
मुंबई, 26 जानेवारी- अनेक वर्षांपासून मनोरंजनविश्वात अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या स्वप्नील जोशीची (Swapnil Joshi) लोकप्रियता प्रचंड आहे. स्वप्नीलचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. लवकरच तो टीव्हीवर म्हणजे मालिका विश्वात पदार्पण करणार आहे. मात्र मालिका कोणती आहे, याबद्दल कुठलीच माहिती समोर आलेली नाही.
एका पोर्टलनं याबद्दल माहिती दिली आहे. स्वप्नील जोशी 2022 मध्ये टीव्ही जगतात एका मालिकेतून परत पाऊल ठेवणार आहे. सध्या मात्र तो चला हवा येऊ द्या आणि दोन वेबसिरिजचे शुटमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर नवीन मालिका करणार आहे.
वाचा-सुख म्हणजे नक्की.. मालिकेत येणार मोठा TWIST; अडाणी गौरी होणार वकील
जीवलगा मालिकेत स्पप्नील दिसला होता. त्यानंत तो कोणत्या मालिकेत दिसला नव्हता.त्यामुळे टीव्हीवर स्वप्निलला पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. सध्या अनेक मोठे कलाकार छोट्या पडद्याकडे वळत आहेत. मालिका विश्वात काहींनी पुन्हा नशिब आजमवण्यास सुरूवात केली आहे. प्रार्थना बेहेर, श्रेयस तळपदे, सचित पाटील यासारख्या कलाकारांनी मालिकेतुन पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाऊल ठेवले आहे. प्रेक्षकांचा यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
स्वप्निल जोशीने मराठीसह हिंदी मालिका विश्वात अभिनयचा ठसा उमठवला आहे. मराठीतील चॉकलेट बॉयची स्वप्निल जोशीची इमेज आहे. त्याने आता पर्यंत एकापेक्षा एक असे मराठी हिट सिनेमे दिले आहेत. याशिवाय तो आता छोट्या पडद्यावर परीक्षकाच्या भूमिकेत देखील दिसतो. वेबसिरीज, सिनेमा, मालिका, नाटक या सर्व माध्यमात त्याने काम केलं आहे. आता पुन्हा तु मालिकांकडे वळणार असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.