Home /News /entertainment /

'मेरी बिवी...'चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीचा हा मजेशीर रील पाहिला का? VIDEO पाहून आवरणार नाही हसू

'मेरी बिवी...'चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीचा हा मजेशीर रील पाहिला का? VIDEO पाहून आवरणार नाही हसू

अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. नुकतंच त्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ (Istagram Video) शेअर केला आहे.

  मुंबई, 8 फेब्रुवारी-   अभिनेता स्वप्नील जोशी   (Swapnil Joshi)  सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. नुकतंच त्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ   (Istagram Video)  शेअर केला आहे. हा व्हिडीओ खरं तर एक मजेशीर रील आहे. स्वप्नीलने चक्क आपल्या पत्नीवरच एक विनोद केला आहे. पाहूआया काय आहे नेमका व्हिडीओ. मराठीतील चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता स्वप्नील जोशीला ओळखलं जातं. अनेक तरुणी स्वप्नीलसाठी वेड्या आहेत. स्वप्नीलचा मोठा चाहतावर्ग आहे. स्वप्नीलने मराठी मालिका,चित्रपट, वेबसीरिज आणि रिएलिटी शोमधून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वप्नील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तो सतत सोशल मीडियावर आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबद्दल पोस्ट शेअर करत असतो. चाहते त्याच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात. नुकतंच स्वप्नील जोशीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एक इन्स्टा रील आहे. या मजेशीर रीलला चाहत्यांकडून प्रचंड पसंती मिळत आहे. स्वप्नीलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याला म्हणतो, 'मेरी बीवी किसी त्योहारसे कमी नही है, यावर स्वप्नील त्याला म्हणतो कयों? तर तो व्यक्ती उत्तर देत म्हणतो 'अरे हर चार-पांच दिन में उसे मनांना पडता है'... असा हा एक हलका फुलका विनोद आहे. याला कॅप्शन देत स्वप्नीलने 'बीवी' असं म्हटलं आहे.
  स्वप्नीलचा हा व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहते मजेशीर कमेंट्स देत आहेत. स्वप्नीलच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तो काही दिवसांपूर्वी समांतर २ या वेबसीरीजमध्ये झळकला होता. दरम्यान त्याने काही मराठी चित्रपटसुद्धा केले. आता तो लवकरच मराठी मालिकेसह छोट्या पडद्यावर झळकणार आहे. सोबतच स्वप्नील 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय शो चा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Instagram post, Marathi entertainment, Swapnil joshi

  पुढील बातम्या