Home /News /entertainment /

स्वप्नील जोशीच्या प्रश्नाचे उत्तर आहे का कोणाकडे ? भन्नाट Video वर सुसाट कमेंट

स्वप्नील जोशीच्या प्रश्नाचे उत्तर आहे का कोणाकडे ? भन्नाट Video वर सुसाट कमेंट

नुकतच स्वप्नील जोशीने एक (swapnil joshi latest reel) रील्स शेअर केले आहे. ही रील्स काहीसं कॉमेडी आहे. त्याच्या या व्हिडिओवर सध्या कमेंटचा वर्षाव सुरू आहे.

  मुंबई, 5 मार्च- अभिनेता स्वप्नील जोशी (swapnil joshi ) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. त्याच्या मुलांसोबतचे फनी व्हिडिओ तसेच त्याच्या कामाबद्दल अपडेस देखील तो शेअर करत असतो. त्याचे भन्नाट रील्समुळे देखील तो चर्चेत असतो. नुकतच स्वप्नीलने एक (swapnil joshi latest reel) रील्स शेअर केले आहे. ही रील्स काहीसं कॉमेडी आहे. यामध्ये स्वप्नीलच्या मागून एक आवज येत आहे. प्यार अगर अंधा है तो अभीतक मुझसे टकराया किंव नही..यावर स्पनील देखील मान हालवताना दिसत आहे. त्याच्या य़ा भन्नाट व्हि़डिओवर चाहत्यांकडून सुसाट कमेंट येत आहेत. स्वप्नील हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, ह्याचं उत्तर आहे का कोणाकडे !?#swwapniljoshi #reels #comedy #timepass #tutevhatashi #t3..त्याचं हे रील्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील त्याचा हा अंदाज भलताच आवडला आहे. यावर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे. वाचा-आमिर खानची मुलगी आयरा बॉलीवूडमध्ये डेब्यूसाठी तयार? सांगितलं सत्य एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की, सर त्याला म्हनाव तुझ्या अंगाचा सुगंध आला आणि त्याला कळाल .... 😂😂 तर दुसऱ्याने म्हटलं आहे की,हो सकता हे वो लंगडा भी हो 😜😂..तर आणखी एकानं म्हटलं आहे की, आम्ही शोधून दमलो यार ..तुमच्याकजे असेल तर द्या..अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. शिवाय अनेकांनी स्माईलीच्या इमोजी देखील पोस्ट केल्या आहेत.
  स्वप्नील जोशी बऱ्याच वर्षांनी एका मालिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याच्यासोबतची जोडीही खूप खास आहे. 'तू तेव्हा तशी' मालिकेत स्वप्नील आणि अभिनेत्री शिल्पा तुळस्कर एक फ्रेश जोडी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेची सध्या सगळीकडे चर्चा आहे. स्वप्नील आणि शिल्पाची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर येत आहे. त्यामुळे चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहात आहेत. तू तेव्हा तशी ही मालिका 30 मार्चपासून झी मराठीवर सुरू होत आहे. वाचा-'अनिरुद्धला महिलांनी सामूहिक शिव्या देणारा कार्यक्रम', मिलिंद गवळींची पोस्ट स्वप्नील जोशी चार वर्षानंतर छोट्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'जीवलगा' ही त्याची शेवटची मालिका होती. स्वप्नील सध्या 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोचा एक भाग आहे. तो या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. तर दुसरीकडे, शिल्पा तुळस्करही शेवटची 'तुला पाहते रे' मध्ये सुबोध भावेसोबत दिसली होती.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Swapnil joshi, Zee marathi serial

  पुढील बातम्या