मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Jaguar I-Pace | स्वप्नील जोशीने खरेदी केली पहिली Electric Car किंमत आणि फिचर्स वाचून तुम्ही लावताल तोंडाला हात

Jaguar I-Pace | स्वप्नील जोशीने खरेदी केली पहिली Electric Car किंमत आणि फिचर्स वाचून तुम्ही लावताल तोंडाला हात

मराठी अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) याने पहिली इलेक्ट्रीक कार (Electric Car) खरेदी केली आहे. ही गाडी Jaguar I-Pace लक्झरी इलेक्ट्रिक SUV असून याची किंमत आणि वैशिष्ट्ये वाचून तुम्हीही तोंडाला हात लावताल.

मराठी अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) याने पहिली इलेक्ट्रीक कार (Electric Car) खरेदी केली आहे. ही गाडी Jaguar I-Pace लक्झरी इलेक्ट्रिक SUV असून याची किंमत आणि वैशिष्ट्ये वाचून तुम्हीही तोंडाला हात लावताल.

मराठी अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) याने पहिली इलेक्ट्रीक कार (Electric Car) खरेदी केली आहे. ही गाडी Jaguar I-Pace लक्झरी इलेक्ट्रिक SUV असून याची किंमत आणि वैशिष्ट्ये वाचून तुम्हीही तोंडाला हात लावताल.

मुंबई, 3 डिसेंबर : चित्रपट कलाकारांमध्ये अलिशान गाड्यांचं (luxury cars) मोठं फॅड पहायला मिळतं. अनेक बॉलिवूड कलाकारांकडे कोट्यवधी रुपयांच्या देशी-विदेशी गाड्या पहायला मिळतात. यात आपले मराठी कलाकारही मागे नाहीत. अनेक मराठी अभिनेते-अभिनेत्रींकडे महागड्या गाड्या आहेत. आता यात आणखी एका गाडीची भर पडली आहे. लोकप्रिय चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेता, स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) याने अलीकडेच एक नवीन Jaguar I-Pace लक्झरी इलेक्ट्रिक SUV खरेदी केली आहे.

दुनियादारी आणि मुंबई-पुणे-मुंबई सारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या स्वप्नीलने आपल्या लक्झरी इलेक्ट्रिक SUV चे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात त्याचं संपूर्ण कुटुंब पहायला मिळत आहे. आपल्या पोस्टमध्ये, स्वप्नीलने गंमतीने 'पुमा ची गाडी आली' असं लिहलं आहे. काय आहेत या कारची वैशिष्ट्ये? (Featuers) किंमत किती असू शकते? चला मग उशीर नको, लगेच जाणून घेऊ.

कोटीची गाडी? price of Jaguar I-Pace

स्वप्नीलने त्याच्या नवीन मौल्यवान कारबद्दल अधिक तपशील उघड केले नाहीत. पण, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वाहन पोर्टलनुसार, फोटोंमधील मॉडेल हे Jaguar I-Pace EV400 चे टॉप-स्पेस HSE प्रकार आहे. या विशिष्ट प्रकाराची सध्या किंमत 1.12 कोटी (ex-showroom, India) पेक्षा थोडी जास्त आहे, तर मुंबईमध्ये त्याची ऑन-रोड किंमत कस्टमायझेशनशिवाय 1.2 कोटीपर्यंत जाऊ शकते.

इतके पैसे मोजले म्हटल्यावर फिचर्स भारीच असणार features of Jaguar I-Pace

हे मॉडेल सॅंटोरिनी ब्लॅक शेडमध्ये आले असून 19-इंच अलॉय व्हील, सिग्नेचर डे टाइम रनिंग लाइट्ससह मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स आणि अॅनिमेटेड डायरेक्शनल इंडिकेटरसह सुसज्ज आहे. इलेक्ट्रिक SUV मध्ये मेमरी फंक्शनसह 16-वे पॉवर-अ‍ॅडजस्टेबल विंडसर लेदर स्पोर्ट सीट्स, मेरिडियन 3D सराउंड साउंड सिस्टीम आणि JLR ची Pivi Pro नेव्हिगेशन सिस्टीम, Apple CarPlay आणि Android Auto सोबत जोडलेली इंटरएक्टिव्ह इन्फोटेनमेंट सिस्टीम देखील आहे. SUV ला सुरक्षा वैशिष्ट्ये देखील मिळतात जसे, की मागील कॅमेरा, स्टीयरिंग असिस्टसह अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ड्रायव्हर कंडिशन मॉनिटर.

हॅक होता होता वाचलं स्वप्नील जोशीचं Instagram; शेअर केला चाहत्यांना..

कारचा परफॉर्मन्स Jaguar I-Pace EV400 electric SUV Performance

गाडीच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर 2021 Jaguar I-Pace EV400 इलेक्ट्रिक SUV 90 kWh लिथियम-आयन बॅटरीसह येते. या बॅटरी प्रत्येक एक्सलवर एक अशा दोन इलेक्ट्रिक मोटर्सला उर्जा देतात. एकत्रितपणे, या इलेक्ट्रिक मोटर्स जास्तीत जास्त 294 kW आऊटपुट देते जे 394 bhp equivalent आहे. ही कार फक्त 4.8-सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. जग्वारचा दावा आहे की I-Pace एका चार्जवर 470 किमी (WLTP cycle) कव्हर करू शकते. वास्तवात जगातील परिस्थितीनुसार विद्युत गाड्यांची श्रेणी (electric range) 300-400 किमी जाते. खास गोष्ट म्हणजे SUV मध्ये इको मोड आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग देखील आहे जे अॅव्हरेज सुधारण्यास मदत करते.

स्वप्नील जोशीची गाडी जोरात! अवघ्या दोन आठवड्यात कमावले इतके कोटी

स्वप्नील जोशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या तो विशाल फुरिया दिग्दर्शित बळी या मराठी भाषेतील हॉरर चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 9 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

First published:

Tags: Marathi cinema, Marathi entertainment, Swapnil joshi