Home /News /entertainment /

सुयश टिळकच्या आयुष्यात लग्नानंतर नव्या फ्रेंडची एंट्री; क्यूट फोटो शेअर करत दिली माहिती

सुयश टिळकच्या आयुष्यात लग्नानंतर नव्या फ्रेंडची एंट्री; क्यूट फोटो शेअर करत दिली माहिती

सुयश टिळकने लग्नानंतर शुटींगला सुरूवात केली आहे. यावेळी त्याला नवीन मित्र मिळाला आहे. या मित्रासोबतचे क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  मुंबई, 11 नोव्हेंबर- मराठमोळा अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावेने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर त्यांच्या देवदर्शनाचे फोटो समोर आले होते. आता यानंतर सुयशने शुटींगला सुरूवात केली आहे. यावेळी त्याला  नवीन मित्र मिळाला आहे. या मित्रासोबतचे क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचा हा नवीन फ्रेंड चाहत्यांना देखील आवडलेला आहे. सुयश टिळकने लग्नानंतर शुटींगला सुरूवात केली आहे. इन्स्टा पोस्टवरून त्याची माहिती सुयशने दिली आहे. त्याला या ठिकाणी नवीन फ्रेंड मिळाला आहे. हा क्यूट फ्रेंड दुसरा तिसर कोण नसून. एक लहान कुत्र्याच पिल्लू आहे. काळ्या रंगाच्या या कुत्र्याच्या पिलासोबत त्यान काही फोटो व व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

  सुयश टिळक डॉग लव्हर आहे. अनेकवेळा त्याच्या लाडक्या डॉगीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या या काही फोटोवर देखील चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. लग्नात देखील सुयशने त्याच्या डॉगीसोबत फोट शेअर केले होते. सुयश प्राणीप्रेमी आहे तसेत तो निसर्गप्रेमी आहे.  व्हिडिओत दोन कुत्र्याची पिल्ली दिसत आहेत. खूपच क्यूट दिसत आहेत. दोन्ही पिल्ल मस्ती करताना दिसत आहेत. वाचा : विकी-कतरिना लग्नानंतर कुठं कुठं जाणार हनीमूनला; असा आहे प्लॅन सुयश टिळकने नुकतीच आयुषी भावेसोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्ननंतर त्यांनी देवदर्शनाचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. सुयश लग्न कोरोनाचे नियम पाळत काही मोजक्या लोकांच्या उपस्थित पार पडले. लग्नाच्या आधीचे कार्यक्रम असतील किंवा लग्न समारंभाचे फोटो सोशल मीडियावर त्यांच्याकडून शेअर करण्यात आले होते. चाहत्यांकडून या जोडीला भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. वाचा : विकी-कतरिना लग्नानंतर कुठं कुठं जाणार हनीमूनला; असा आहे प्लॅन सुयश लग्नानंतर कोणत्या नवीन प्रोजक्ट्समध्ये दिसणार आहे याची माहिती समोर आलेली नाही.  यापूर्वी तो ऑनलाईन  शुभमंगल या मालिकेत शेवटचा दिसला होता. आता त्याला पुन्हा नवीन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या