मुंबई, 16 मे- अभिनेता सुशांत शेलारच्या (sushant shelar) गाडीवर दगडफेक आणि गाडीची (sushant shelar vehicle ) तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी सुशांत शेलार याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
सुशांत शेलार यांच्या राहत्या घराच्याबाहेर ही घटना घडली आहे. रात्री 1.30 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने येऊन कारवर दगड मारला. यात कारची समोरील काच पूर्णपणे फुटली आहे. तसंच हा या इसमाने कारच्या समोर येऊन बेरिकेट्सही लावले आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सुशांत शेलार याला याबद्दल विचारले असता त्यानेही हा भ्याड हल्ला असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.