सुनील बर्वे यांनी नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओमध्ये सुनील आणि मुलगी सानिका डान्स करत असल्याचं दिसत आहे. मुलीच्या लग्नाचे हे खास क्षण सुनील आपल्या डोळ्यामध्ये साठवत आहेत. या व्हिडीओमध्ये सुनील आणि सानिका खुपचं भावुक करणाऱ्या ‘राझी’ चित्रपटातील ‘बाबा मै तेरी मालिका’ या गाण्यावर डान्स करत आहेत. या दोघांना पाहून समोर उपस्थित असणारे सर्वच कलाकार भावुक झाले आहेत. या बापलेकींच्या जोडीचा हा क्षण पाहून समोर उभे असलेले पुष्कर श्रोत्री, सुमित राघवन, अतुल परचुरेसुद्धा भावुक झाले आहेत. (हे वाचा:PHOTOS: स्मिता गोंदकरचा राजेशाही थाट! अभिनेत्रीनं वेधलं सर्वांचं लक्ष ) सुनील यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत अगदी हळवं असं कॅप्शनसुद्धा दिलं आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत सुनील यांनी म्हटलं आहे, ‘तो क्षण ज्याला मी तिच्या जन्मापासून घाबरत होतो’. या कॅप्शननं सर्वांनाचं अगदी भावुक केलं आहे. सुनील बर्वे यांनी नुकताच आपल्या पत्नीसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. (हे वाचा:‘लिटल चॅम्प’ फेम राशी पगारेची बहीण आहे प्रसिध्द अभिनेत्री; जाणून घ्या जोडीबद्दल ) सुनील बर्वे हे मराठीतील एक उत्मम अभिनेता आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांना प्रेक्षकांनी आपलसं केलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment