मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'शेफाली वैद्य ..काय फरक मग तुमच्यात आणि क्रांतीला ट्रोल करणाऱ्यांमध्ये?' ; सुमित राघवनची सणसणीत पोस्ट

'शेफाली वैद्य ..काय फरक मग तुमच्यात आणि क्रांतीला ट्रोल करणाऱ्यांमध्ये?' ; सुमित राघवनची सणसणीत पोस्ट

समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपानंतर क्रांती रेडकरने (Kranti Redkar) पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे.  आता या प्रकरणाच्या संदर्भाने लेखिका शेफाली वैद्य (Shefali Vaidya) आणि मराठमोळा अभिनेता सुमित राघवन (Sumeet Raghvan) यांच्यात ट्वीटर वॉर रंगल आहे.

समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपानंतर क्रांती रेडकरने (Kranti Redkar) पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. आता या प्रकरणाच्या संदर्भाने लेखिका शेफाली वैद्य (Shefali Vaidya) आणि मराठमोळा अभिनेता सुमित राघवन (Sumeet Raghvan) यांच्यात ट्वीटर वॉर रंगल आहे.

समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपानंतर क्रांती रेडकरने (Kranti Redkar) पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. आता या प्रकरणाच्या संदर्भाने लेखिका शेफाली वैद्य (Shefali Vaidya) आणि मराठमोळा अभिनेता सुमित राघवन (Sumeet Raghvan) यांच्यात ट्वीटर वॉर रंगल आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 28 ऑक्टोबर :क्रुझ पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) याचा लेक आर्यन खानला (aryan khan) अटक झाल्यापासून हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. सध्या या प्रकरणाला नवीन वळण लागलं असून रोज याप्रकरणी नवीन खुलासे होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. या गंभीर आरोपांनंतर त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. या संपूर्ण प्रकारानंतर काही मोजकेच मराठी कलाकार क्रांतीच्या पाठिंबा देताना दिसत आहेत. पण आता या प्रकरणाच्या संदर्भाने लेखिका शेफाली वैद्य (Shefali Vaidya) आणि मराठमोळा अभिनेता सुमित राघवन (Sumeet Raghvan) यांच्यात ट्वीटर वॉर चांगलाच रंगल्याचे दिसत आहे. सुमित राघवनची पत्नी अभिनेत्री चिन्मयी सुमित (ChinmayeeSumeet) हिच्या एका पोस्टने या वादाची सुरूवात झाली आहे.

चिन्मयी एक पोस्ट करत म्हटलं होत की, मला अनावर इच्छा झाली होती, एखादी सणसणीत पोस्ट टाकायची. पण ती ‘टिकली’नाही. अलीकडेच शेफाली वैद्य यांनी टिकली वरून एक पोस्ट केली होती. ज्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. आता चिन्मयीच्या या पोस्टनंतर शेफाली वैद्य यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत चिन्मयीला सुनावलं होतं. ते टिकलीचं राहू द्या, पण थोडा सणसणीतपणा जरा क्रांती रेडकरबद्दल दाखवा की, की त्या विषयावर बोलताना धडधडीत शेपूट घातली? असा सवाल त्यांनी केला होता.

वाचा : “हे बघ भावा तुझा पोरगा दोषी....” ; मराठी अभिनेत्याची ती पोस्ट चर्चेत

शेफाली यांच्या या पोस्टनंतर चिन्मयीचा पती सुमितने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना जशास तसं उत्तर दिलं आहे. सुमितनं  एकामागोमाग एक ट्वीट करत म्हटलं आहे की, काही दिवसांपूर्वी क्रांतीला असभ्य भाषेला सामोरं जावं लागलं आणि त्याबद्दल मी ट्विट केलं होतं आणि क्रांतीला पूर्ण पाठिंबा दिला होता. काल पासून माझ्या बायकोला देखील तशाच भाषेला तोंड द्यावं लागतंय. कारण शेफाली वैद्य ताई, तुम्ही चिन्मयीच्या एका पोस्टला भलतंच वळण दिलं. दुसरी गोष्ट, कोणी कोणाला पाठिंबा द्यायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. शिवाय जी भाषा तुम्ही स्वत: चिन्मयीसाठी वापरली आहे ती आक्षेपार्ह आहे.

शेफाली ताई,मी एवढंच म्हणू इच्छितो. काल तुमच्या अनुयायांनी अतिशय घाणेरड्या भाषेचा प्रयोग करून तिला प्रचंड त्रास दिलाय. क्रांती बद्दल कळवळा आहे ते बरोबरच आहे परंतु तुम्ही एका शब्दाने चिन्मयीसाठी तुमच्या अनुयायांनी केलेल्या असभ्य भाषेचा निषेध केला का? काय फरक आहे मग तुमच्यात आणि क्रांतीला ट्रोल करणा-यांमध्ये? विचारसरणी आणि मुद्दे वेगळे असू शकतात ताई. हे अपमानास्पद आणि निषेधार्ह आहे, असं सुमितनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

वाचा : 'रंग माझा वेगळा'मधील दीपाचा नो मेकअप लुक पाहून नेटकरी म्हणाले....

शेफाली वैद्य यांची काही होत टिकली पोस्ट

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची टिकली न लावलेली जाहिरात शेफाली वैद्य यांनी वर्तमानपत्रात पाहिली व त्याच्यावर टीका केली होती. त्यांनी म्हटलं होत की, हिंदूंच्या कोणत्याही सणात विवाहित स्त्रिया असूदेत किंवा लहान मुली असुदे टिकली लावून सण साजरे करतात. परंतु, जाहिरातीत मॉडेलच्या कपाळावर टिकली नव्हती. तरीही ती दिवाळीसाठीच्या दागिन्यांची जाहिरात करत होती. त्यामुळे शेफाली यांनी ‘नो टिकली, नो बिसनेस’ हा हॅशटॅग सुरू केला होता.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Marathi entertainment