मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'सोन्याचांदीचा माज कुणीतरी उतरवायलाच हवा होता..', सोशल मीडियावरुन का भडकला सुबोध भावे?

'सोन्याचांदीचा माज कुणीतरी उतरवायलाच हवा होता..', सोशल मीडियावरुन का भडकला सुबोध भावे?

वाढत्या महागाईवरून मराठमोळा अभिनेता सुबोध भावेने एक मार्मिक पोस्ट केली (Subodh Bhave And Petrol diesel Price hike) आहे. सध्या सुबोध भावेची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

वाढत्या महागाईवरून मराठमोळा अभिनेता सुबोध भावेने एक मार्मिक पोस्ट केली (Subodh Bhave And Petrol diesel Price hike) आहे. सध्या सुबोध भावेची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

वाढत्या महागाईवरून मराठमोळा अभिनेता सुबोध भावेने एक मार्मिक पोस्ट केली (Subodh Bhave And Petrol diesel Price hike) आहे. सध्या सुबोध भावेची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मुंबई, 10 ऑक्टोबर : वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. दिवसागणिक पेट्रोलचे गगनाला भिडणारे भाव प्रत्येकालाच अस्वस्थ करणारे आहेत. या वाढत्या महागाईवरून मराठमोळा अभिनेता सुबोध भावेने एक मार्मिक पोस्ट केली (Subodh Bhave on Petrol diesel Price hike) आहे. सध्या सुबोध भावेची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. सुबोधच्या (Subodh Bhave)  या पोस्टने पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे व ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आपल्या पोस्टमध्ये सुबोध म्हणतो, ‘सतत असं वाटायचं की या सोनं आणि चांदी चा माज कोणीतरी उतरवला पाहिजे, त्यांना त्यांच्या किंमतीमुळे आपण लैच भारी असं वाटायला लागलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

तो पुढे असं म्हणाला की, 'दरवर्षी सण आला की त्यांचा रुबाब वाढायचा. पण आता नाही ..... कारण आता पेट्रोल आणि डिझेल यांनी सोन्या,चांदीची मस्ती उतरवली. आता दागिने पण यांचेच करणार, बँकेत ठेव म्हणून पण हेच ठेवणार. स्वतःबरोबर अख्खा बाजारभाव वाढवण्याच यांचं कर्तृत्व अफाट आहे. हे दोन नवीन भारीतले दागिने आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.' अशाप्रकारे मार्मिक पोस्ट करत सुबोध देशातील वाढत्या महागाईवरून अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

वाचा :Navratri च्या चौथ्या दिवशी जगदंबा मातेच्या रुपात सजली ही अभिनेत्री; पाहा ओळखू येतेय का

या पोस्टसोबत सुबोधने पेट्रोल आणि डिझेलचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे. या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडत आहे.काहींनी सुबोधने हा विषय मांडल्याबद्दल कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, सरजी उद्या इन्कम टॅक्स किंवा ED नोटीस येऊ शकते तयारीत राहा. तर दुसऱ्याने म्हटले आहे की, सहमत. सर तुम्ही कायमच सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत असता. आपल्याला पुढे याचा त्रास होईल न होईल याचा विचार न करता. सर्वांनीच असा विचार करायला हवा. एकाने कमेंट केली आहे की, अवघड परिस्थितीला विनोदाची फोडणी कशी द्यावी ते तुमच्याकडून शिकावं.

वाचा :'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटाने वाढवलं होतं स्पेनचं टुरिझम! वाचा अजब किस्सा

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल 80 डॉलर प्रति बॅरल पोहोचले आहेत. त्यातच पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटाच लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 110 रुपये प्रति लीटरवर आहेत तर डिझेलही शंभरीपार गेलं आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment