मुंबई, 11 मे- गेली दीड वर्ष झालं, कोरोनाने(
Coronavirus) अक्षरशः थैमान घातला आहे. त्यामुळे इतर गोष्टींसारखचं मनोरंजनावर सुद्धा त्याचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक दिवसांना पासून थियेटर बंद आहेत. त्यामुळे सध्या ओटीटी(
OTT) प्लॅटफॉर्मची मोठी चलती आहे. याच प्लॅटफॉर्मबद्दल मराठी अभिनेता सुबोध भावेनं(
Subodh Bhave) सुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे. सुबोधला या प्लॅटफॉर्ममध्ये एक खूप मोठा फायदा दिसून येत आहे. पाहूया सुबोधनं या माध्यमा बद्दल नेमकं काय म्हटलं आहे.
नुकताच अभिनेता सुबोध भावेनं एका माध्यमात मुलाखती दरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्म बद्दल आपलं मत व्यक्त केलं होतं. यावेळी सुबोधला विचारण्यात आलं होतं, की नव्याने सुरु झालेल्या ओटीटी माध्यमाकडे तू कशा पद्धतीने बघतोस. किंवा याबद्दल तुला काय जाणवतं. यावर सुबोधनं म्हटलं आहे, ‘ मी स्वतः या माध्यमात काम केलेलं नाही. त्यामुळे त्यावर काम करण्याचा अनुभव नेमका कसं आहे. हे मला नाही सांगता येणार.
मात्र या माध्यमाबद्दल माझं असं मत आहे, ‘हे माध्यम नवोदित कलाकारांसाठी एक पर्वणी ठरत आहे. ज्या भाषिक कालाकारांना आज पर्यंत मुख्य प्रवाहात काम करण्याची अजून संधीच मिळाली नाही. त्यांना याठिकाणी एक चांगलं व्यासपीठ मिळालं आहे. हे लोक आपली कला याठिकाणी सादर करू शकतात. त्यांना एखादा मोठा चित्रपटचं हवा असा इथ विषयच नाही.
(हे वाचा:
श्वेता तिवारीच्या Ex-नवऱ्याचा ड्रामा! मुलाला हिसकावून घेण्याची घटना CCTVत कैद )
आपण एखाद्या मोठ्या कलाकाराचं नाव बघून आज पर्यंत थियेटरला जात होतो. आणि त्यानंतर आपल्या एखाददुसरा नवा कलाकार तिथे पाहायला मिळत होता. मात्र ओटीटीवर आपल्याला हवं तितके नवे शो पाहता येतात. आणि प्रत्येक वेळी आपल्याला एखाद्या नवोदित कलाकारचं काम अचंबित करून जातं.
(हे वाचा:
आज मला शांत झोप लागेल', कोरोनामुक्त प्रिया बापटने पहिल्यांदाच केलं मोठं काम )
त्यामुळे ओटीटी हे माध्यम माझ्या दृष्टीने तर एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरत आहे. अनेक कलाकारांना आपल्यातील कलागुण सादर करायला मोठी संधी मिळत आहे. त्यामुळे ही खुपचं चांगली गोष्ट आहे’.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.