बिग बी अमिताभ यांच्याबरोबर 'AB आणि CD' गिरवताना दिसणार 'हा' मराठमोळा हिरो

बिग बी अमिताभ यांच्याबरोबर 'AB आणि CD' गिरवताना दिसणार 'हा' मराठमोळा हिरो

अभिनयातील शहेनशहा बरोबर आपल्या मातृभाषेतल्याच सिनेमात काम करायची संधी या अभिनेत्याला मिळाली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 मे- बिग बी अमिताभ बच्चन बॉलिवूड नंतर आता मराठी सिनेमातही आपल्या अभिनयाची कमाल दाखवायला तयार झाले आहे. तब्बल 25 वर्षांनतर अमिताभ बच्चन मराठी सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दिग्दर्शक मिलिंद लेले यांच्या 'ए बी आणि सी डी' या सिनेमात अभिनेते विक्रम गोखले प्रमुख भूमिकेत दिसणार असून अमिताभ बच्चन या सिनेमात विक्रम गोखलेंच्या मित्राची भूमिका या सिनेमात साकारत आहेत. दरम्यान या सिनेमात अभिनेता सुबोध भावेचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.

दुबईत तब्बल 20 हजार फुटांवरून या बॉलिवूड अभिनेत्रीने मारली उडी आणि...

नुकतंच सुबोधने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर बिग बींसोबतचा फोटो शेअर करून त्याची स्वप्नपूर्ती झाल्याचं म्हटलं. इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना सुबोधने लिहिले की, ‘निर्विवाद पणे ते अभिनयाचे शहेनशहा आहेत. त्यांच्या बरोबर काम करावं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. माझंही होतं आणि माझ्या मातृभाषेतील,मिलिंद लेले दिग्दर्शित " AB आणि CD" चित्रपटात ते साकार झालं. कलाकारांनी कसं असावं कसं वागावं कसं रहावं आणि कसं काम करावं याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. मला ही संधी दिल्याबद्दल माझ्या टीम चे मनपूर्वक आभार.’
 

View this post on Instagram
 

निर्विवाद पणे ते अभिनयाचे शहेनशहा आहेत.त्यांच्या बरोबर काम करावं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. माझंही होतं आणि माझ्या मातृभाषेतील,मिलिंद लेले दिग्दर्शित " AB आणि CD" चित्रपटात ते साकार झालं. कलाकारांनी कसं असावं कसं वागावं कसं रहावं आणि कसं काम करावं याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. मला ही संधी दिल्याबद्दल माझ्या टीम चे मनपूर्वक आभार. @planet.marathi #ABaaniCD


A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

दिग्दर्शक मिलिंद लेले यांच्या 'ए बी आणि सी डी' या सिनेमात अभिनेते विक्रम गोखले प्रमुख भूमिकेत दिसणार असून अमिताभ बच्चन या सिनेमात विक्रम गोखलेंच्या मित्राची भूमिका या सिनेमात साकारत आहेत. याशिवाय या सिनेमात सुबोध भावेचीही महत्त्वाची भूमिका असल्यानं तो अमिताभ बच्चन यांच्याकडून अभिनयाच्या एबीसीडीचे धडे घेताना दिसणार आहे. 'ए बी आणि सी डी'या सिनेमाचं शूटिंग 20 मे पासून मुंबईत सुरू  झालं आहे. याशिवाय या सिनेमातील काही दृश्याचं शूटिंग हे पुण्यातही होणार आहे.

…म्हणून वयाच्या 14 व्या वर्षी शाहरुखच्या मुलाने सोडलं होतं घर

या सिनेमाचं कथानक सीडी या व्यक्तिरेखेभोवती फिरते सिनेमातील मुख्य व्यक्तिरेखा चंद्रकांत देशपांडे (विक्रम गोखले) म्हणजेच सीडी हे एक निवृत कलाशिक्षक असतात आणि अचानक अभिनेता अमिताभ बच्चन म्हणजेच एबी हे आपले वर्गमित्र असल्याचं त्यांना समजत आणि नंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल होतात. हे या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'ए बी आणि सी डी'मध्ये दोन गाणीही आहेत. या सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद हेमंत ऐदलाबादकर यांनी लिहिले आहेत.

प्रेग्नंट गर्लफ्रेंडसोबत मालदीवमध्ये ‘बेबीमून’ एन्जॉय करतोय अर्जुन

SPECIAL REPORT : विवेक ओबेरॉयच्या मीमचा असा घेतला टि्वटरकरांनी बदला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2019 01:47 PM IST

ताज्या बातम्या