Home /News /entertainment /

VIDEO: 'जगातली सगळ्यात प्रगत'; सिद्धार्थ चांदेकरची 'ती' पोस्ट होतेय VIRAL

VIDEO: 'जगातली सगळ्यात प्रगत'; सिद्धार्थ चांदेकरची 'ती' पोस्ट होतेय VIRAL

मराठीतील सर्वात क्युट कपल्सपैकी एक म्हणून मिताली मयेकर (Mitali Mayekar) आणि सिद्धार्थ चांदेकर (Sidharth Chandekar) यांना ओळखलं जातं. या दोघांच्या जोडीला चाहते भरभरून प्रेम देत असतात. म्हणूनच चाहत्यांना त्यांच्यबद्दल प्रत्येक अपडेट्स जाणून घ्यायला आवडतं.सिद्धार्थ आणि मिताली दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. हे दोघेही विविध पोस्ट शेअर करत असतात. दरम्यान सिद्धार्थने एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 26 मे-  मराठीतील सर्वात क्युट कपल्सपैकी एक म्हणून मिताली मयेकर  (Mitali Mayekar) आणि सिद्धार्थ चांदेकर  (Sidharth Chandekar)  यांना ओळखलं जातं. या दोघांच्या जोडीला चाहते भरभरून प्रेम देत असतात. म्हणूनच चाहत्यांना त्यांच्यबद्दल प्रत्येक अपडेट्स जाणून घ्यायला आवडतं.सिद्धार्थ आणि मिताली दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. हे दोघेही विविध पोस्ट शेअर करत असतात. दरम्यान सिद्धार्थने एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. सिद्धार्थ आणि मितालीला प्राणीमात्रांवर प्रचंड प्रेम आहे. ते सतत प्राणी-पशूंचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यामुळेच त्यांनी आपल्या घरात एक छानसा डॉगी पाळला आहे. या डॉगीवर सिद्धार्थ आणि मितालीचा किती जीव आहे हे त्यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट पहिल्यांनंतर लक्षात येतंच. नुकतंच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ फारच मजेशीर आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ चाहत्यांना सांगत आहे, 'या व्हिडीओमध्ये या एका अत्यंत प्रगत अशा डिश अँटेनाचं प्रमोशन करणार आहे. त्यांनतर तो आपला मोबाईल फिरवून आपल्या डॉगीला दाखवितो. खरं तर सिद्धार्थने आपल्या लाडक्या डॉगीला एक मानेचा पट्टा लावला आहे. या सर्वामागे एक कारणसुद्धा आहे.
  वास्तविक मिताली नुकतंच जंगल सफारीवर गेली होती. टाय घनदाट जंगलाची सफर करत चाहत्यांना जंगलाचं दर्शन घडवलं होतं. सध्या ती घरी परतली आहे. मात्र तिच्या पायाला जखम झालेली आहे. त्यामुळे तिने त्या जखमेवर ड्रेसिंग करुन घेतलं आहे. आणि आपल्या डॉगीने आपला पाय चाटू नये, किंवा पाय ड्रेसिंग चाटून ते काढू नये. यासाठी या सेलेब्रेटी कपलने ही शक्कल लढविली आहे. सिद्धार्थने या पोस्टला कॅप्शन देत लिहिलंय, ''जगातली सगळ्यात प्रगत Dish Antenna!🐶 P.S तिच्या पायाला जखम झाली आहे. ज्यावर औषध लावलेलं आहे. ते तिने चाटून काढू नये म्हणून हा Cone लावावा लागतो''. (हे वाचा: हे काही आठवडे...' Cannes रेड कार्पेटवरील फोटो शेअर करत जितेंद्र जोशीने लिहिली लक्षवेधी पोस्ट) अभिनेत्याची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वजण मजेशीर कमेंट्स देत आहेत. अभिनेत्री सई ताम्हणकर, गौरी नलावडे, ईशा केसकर, नचिकेत लेले, जुईली जोगळेकर अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स दिल्या आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Instagram post, Marathi entertainment

  पुढील बातम्या