Home /News /entertainment /

'लालबाग परळ.. .' ; सिद्धार्थ जाधवची ती पोस्ट चर्चेत

'लालबाग परळ.. .' ; सिद्धार्थ जाधवची ती पोस्ट चर्चेत

लालबाग परळ चित्रपटात सिद्धार्थने साकारलेली स्पीडब्रेकर भूमिका महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या सोहळ्याच्यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे.सिद्धार्थ जाधवने यानिमित्त एक खास व्हिडिओ शेअर करत पोस्ट देखील लिहिली आहे.

  मुंबई, 30 नोव्हेंबर- मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव(siddharth jadhav)  सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. सिद्धार्थ जाधवने अभिनयाच्या जोरावर हिंदीमध्ये देखील ठसा उमठवला आहे. सिद्धार्थ सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांशी कनेक्ट राहतो तसेच त्याच्या आगामी प्रोजक्टविषयी माहिती देखील शेअर करत असतो. नुकतेच त्याने त्याच्या आगी प्रोजक्टविषयी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. सिद्धार्थ जाधवने लालबाग परळ चित्रपटातील निभावलेला गण्या उर्फ स्पीडब्रेकर त्याने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळा ठरला होता. मिलच्या जागी शॉपिंग मॉल उभारले जाणार होते. मात्र या मिलमध्ये काम करणारे कामगार बेरोजगार झाले होते. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध अनेकांनी आवाज उठवला, मात्र कालांतराने तो आवाज विरळ झाला. काम बंद पडल्याने कामगारांच्या कुटुंबावर आलेल्या परिस्थिचा आढावा महेश मांजरेकर यांनी लालबाग परळ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडला होता. या चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. एक दर्शकपूर्ती झालेल्या ह्या चित्रपटाच्या अनेक आठवणी आहेत.  लालबाग परळ चित्रपटात सिद्धार्थने साकारलेली स्पीडब्रेकर  भूमिका महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या सोहळ्याच्यानिमित्ताने पुन्हा एकदा  प्रेक्षकांसमोर  येणार आहे. वाचा :गायिका शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ; हटके वरमाला चर्चेत सिद्धार्थ जाधवने यानिमित्त एक खास व्हिडिओ शेअर करत पोस्ट देखील लिहिली आहे. त्याने म्हटलं आहे की,“स्पीडब्रेकर" ची दशकपूर्ती... "लालबाग परळ" मधला स्पीडब्रेकर माझ्यासाठी कायमची लक्षात राहणारी आणि जवळची भूमिका आहे.. "महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?"सुवर्णदशक सोहळ्यानिमित्त पुन्हा एकदा स्पीडब्रेकर लोकांसमोर येणार आहे..!
  एक भूमिका एक दशकभर प्रेक्षकांच्या लक्षात राहते, प्रेक्षक भरभरून तिच्यावर प्रेम करतात.. आणि त्याच भूमिकेला जेव्हा दशकातील सर्वोत्तम भूमिकेयासाठी नॉमिनेशन मिळतं तेव्हा नक्कीच माझ्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे..महेश मांजरेकर सरांचे @maheshmanjrekar या निमित्ताने पुन्हा एकदा आभार, स्पीडब्रेकर साठी त्यांनी माझी निवड केली, माझ्यावर विश्वास टाकला.. जे वातावरण मी माझ्या लहानपणापासून जगात आलो, त्याच वातावरणातील भूमिकेसाठी मला मिळणार नॉमिनेशन म्हणजे माझ्यासाठी सन्मानच आहे...
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या