मुंबई, 23 मार्च- मराठी सिनेसृष्टीत चॉकलेट बॉय हँडसम हंक म्हणून चर्चेत असलेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थनं त्याच्या अभिनयानं सर्वांची मन जिंकलीच आहेत. मात्र त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील तो चर्चेत असते. मागील वर्षी सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर यांनी मुंबईत हक्काचं घर घेतलं होतं. सोशल मीडिया पोस्ट करत त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. घर घेऊन आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानंतर नुकतीच सिद्धार्थनं त्याच्या घराबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या सिद्धार्थची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
कोरोना संकटाचा फटका सर्वांना बसला, मनोरंजन विश्वाला देखील याचा मोठा फटका बसला. अनेक कलाकारांना जगणं अवघड झालं होतं. पण हळुहळू का होईना सगळं नीट झालं. चित्रीकरणाला परवानगी मिळाली. अनेकांना काम मिळाली आणि सगळं कसं सुरळीत सुरू झालं. यानंतर अनेक मराठी कलाकार घर, गाडी खरेदी करताना दिसले. सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर यांनी देखील मुंबईत घर घेतलं. मुबंई सारख्या शहरामध्ये स्वतःचं हक्काचं घर खरेदी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं. आता याच घराबद्दल सिद्धार्थ चांदेकरनं एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे.
वाचा-'जी हाँ हुजूर, मैं गीत बेचता हूँ..' नागराज मंजुळेनं सादर केली अफलातून कविता!
सिद्धार्थ व मितालीला घर खरेदी करुन वर्ष पूर्ण झालं आहे. याचनिमित्त सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली. पण हे घर खरेदी करताना मनात नेमक्या काय भावना होत्या? याबाबत त्याने पोस्ट लिहिली आहे. शिवाय वर्षभरापूर्वी घर खरेदी केल्यावर शेअर केलेला फोटो त्याने पुन्हा शेअर केला आहे.
सिद्धार्थनं यामध्ये म्हटलं आहे की, “वर्षभरापूर्वी मी मुंबईमध्ये माझं पहिलं घर रजिस्टर केलं. लोन, डाऊन पेमेंट, खर्च याची भीती वाटायची. नंतर जाणवलं भीती उडी मारायची होती. ती मारल्यावर आपोआप पोहता येतं”. सिद्धार्थच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोघांनीही अगदी मेहनत करत त्यांचं हे घर खरेदी केलं आहे.
View this post on Instagram
काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थने त्यांच्या नवीन घराचा व्हिडिओ देखील सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये दोघांनीही त्यांच्या घराची सजावट कशाप्रकारे केली आहे हे पाहायला मिळालं. चांदेकर अशी त्यांच्या घराची पाटी या व्हिडिओमध्ये लक्ष वेधून घेते.
सिद्धार्थ-मिताली लव्हस्टोरी
एका मालिकेच्या सेटवर या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. या भेटीत हळूहळू मैत्रीत रुपांतर झालं. 2017 मध्ये सिद्धार्थने मितालीच्या वाढदिवसानिमित्त एका सरप्राइज पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला मिताली व सिद्धार्थचे जवळचे मित्रमैत्रिणी उपस्थित होते. त्यांच्यासमोर सिद्धार्थने मितालीला लग्नाची अंगठी देत आपल्या प्रेमभावना व्यक्त केल्या. मितालीने होकार कळवताच दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट केले.
काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. जवळपास दोन वर्ष हे दोघं लिव्ह इनमध्ये राहिले. 2019 मध्ये या दोघांचा साखरपुडा पार पडला. 24 जानेवारी 2021 रोजी सिद्धार्थ व मिताली विवाहबंधनात अडकले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.