श्रेयस तळपदे झाला तीन मुलांचा बाप

श्रेयस तळपदे झाला तीन मुलांचा बाप

काही दिवसांपूर्वी श्रेयसने मुलीचा पहिला फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता.

  • Share this:

मुंबई, 18 जुलैः आपल्या हरहुन्नरी अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेला अभिनेता श्रेयस तळपदे काही दिवसांपूर्वीच एका चिमुकलीचा बाबा झाल्याचे कळले होते. काही दिवसांपूर्वी मुलीचा पहिला फोटोही श्रेयसने सोशल मीडियावर शेअर केला होता. पण तुम्हाला माहित आहे का, श्रेयस चक्क तीन मुलांचा बाप झाला आहे. हे वाचून तुम्हाला धक्का बसेल, पण श्रेयस खऱ्या आयुष्यात तीन मुलांचा बाप होत नसून सिनेमात तो तीन मुलांचा बाप झाला आहेत.

'तीन दोन पांच' या आगामी सिनेमात श्रेयस महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात वैवाहिक आयुष्यात तीन मुलांना सांभाळताना होणारी तारेवरची कसरत आणि त्यातून होणारा गोंधळ दाखवण्यात येणार आहे. या सिनेमाद्वारे गीतकार अमिताभ वर्मा दिग्दर्शनात पदार्पण करत असून बिंदीया बगही सिनेमात सहअभिनेत्री म्हणून काम करणार आहे.

सिनेमातील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला की, सिनेमाचा नायक बांधकाम कंपनीत काम करत असतो. त्याचं आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम असतं. पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी नायक वाट्टेल ते करायला तयार असतो. पण वैवाहिक जीवनात येणाऱ्या आव्हानांचा ते कशाप्रकारे सामना करतात यावर सिनेमा बेतलेला आहे. 'गोलमाल अगेन' या सुपरहिट सिनेमानंतर श्रेयस सध्या 'तीन दो पांच' सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे.

हेही वाचाः

PHOTOS: बॉलिवूडपेक्षा लोकप्रिय आहेत 'या' 5 भोजपुरी अभिनेत्री

'एलफिन्स्टन रोड' स्टेशन आता या नावाने आेळखले जाणार!

उल्हासनगर हादरले,११ वर्षाच्या मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या

First published: July 18, 2018, 9:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading