Home /News /entertainment /

INSTARGAM वर श्रेयस तळपदेची हवा; सर्वाधिक फॉलोअर्स असलेला दुसऱ्या नंबरचा मराठी अभिनेता

INSTARGAM वर श्रेयस तळपदेची हवा; सर्वाधिक फॉलोअर्स असलेला दुसऱ्या नंबरचा मराठी अभिनेता

श्रेयस तळपदेनं इन्स्टाग्रामवर (Shreyas Talpade On Instagram ) नुकताच 1 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पार केला आहे.

    मुंबई, 6 मार्च- अभिनेता श्रेयस तळपदेनं (Shreyas Talpade )  मराठीसह हिंदीमध्ये देखील अभिनयाचा ठसा उमठवला आहे. श्रेयस सध्या झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत यशची भूमिका साकारताना दिसत आहे. त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. श्रेयसचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. नेहमीच तो या माध्यामातून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतो.. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रत्तेक वयोगटातील प्रेक्षकांच मनं जिंकल आहे. त्याच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. श्रेयसनं इन्स्टाग्रामवर   (Shreyas Talpade On Instagram )  नुकताच 1 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पार केला आहे. आणि विशेष म्हणजे एवढे जास्त फॉलोवर्स असणारी मराठी मालिकेतील तो दुसरा अभिनेता आहे. श्रेयसच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. काही दिवसापूर्वी अभिनेत्री हृता दुर्गुळे मराठीतीव पहिली अभिनेत्री ठरवली होती, जिनं इन्स्टाग्रामवर 2.4 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पार केला होता. आता त्यानंतर मराठी मालिका विश्वातील श्रेयसनं इन्स्टाग्राम नुकताच 1 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पार केला आहे. श्रेयसनं मराठीसह हिंदी सिनेमात देखील काम केलं आहे. मोठा पडदा गाजवल्यानंतर त्याने माझे तुझी रेशीमगाठ या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. त्याच्या कमबॅकला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस त्याच्या चाहत्यांची संख्या ही वाढत आहे. स्वप्नील जोशी हा मराठी मनोरंजन विश्वातील इन्स्टाग्रामवर 1.2  मिलियन फॉलोवर्स असलेला पहिला अभिनेता आहे.  त्याचा देखील सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे. श्रेयस मुळचा मुंबईचा अंधेरीतील श्री राम वेल्फेअर सोसायटीच्या हायस्कूलमध्ये त्याचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर विलेपार्लेमधल्या मिठीबाई कॉलेजमध्ये त्याने उच्च शिक्षण घेतलं. आँखे या हिंदी चित्रपटातून त्याने सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. आतापर्यंत त्याने मराठी मालिका, तसेच मराठीसह हिंदी चित्रपटात देखील काम केलं आहे. पछाडलेला, सावरखेड- एक गाव, सनई चौघडे, पोस्टर बॉईज, बाजी हे त्याचे मराठी चित्रपटही गाजले. वाचा-पुष्पा फेम Allu Arjun कडून घडला गुन्हा, पोलिसांनी पकडून केली कारवाई आभाळमाया या गाजलेल्या मराठी मालिकेतही त्याने काम केलं आहे. दामिनी, अवंतिका या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. ओम शांती ओम, गोलमाल रिटर्न्स, गोलमाल 3, सिंबा यासारख्या हिंदी सिनेमात देखील त्याने अभिनयाचा ठसा उमठवला आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

    पुढील बातम्या